शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी --
- कायदेशीर सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कायद्याच्या स्मरणार्थ सर्व विधी सेवा
प्राधिकरणाकडून भारतात दर वर्षी 9 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय विधी सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या दिनाचे औचित्य साधून आज शिंदखेडा न्यायालयात राष्ट्रीय विधी सेवा दिन साजरा करण्यात आला.त्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून शिंदखेडा तालुक्यात विविध गावांमध्ये कायदेविषयक जनजागृती व मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम शिंदखेडा न्यायालय व वकील संघाच्या वतीने राबविण्यात येत आहेत.त्यानंतर आज कायदेविषयक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅली शिंदखेडा न्यायालयाचे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश ए.बी.तहसिलदार यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक, गांधी चौक , स्टेशन रोडवरुन काढण्यात आली. सदर रॅलीत शिंदखेडा वकील संघाचे पदाधिकारी व वकील तसेच न्यायालयीन कर्मचारी सहभागी झाले होते. त्यानंतर कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवानी न्यायाधीश ए.बी. तहसीलदार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक दिवाणी न्यायाधीश एम.आर.कायस्थ तर शिंदखेडा वकील संघाचे अध्यक्ष अँड.व्ही.ए.पवार , उपाध्यक्ष अँड. बी.झेड.मराठे, सचिव अँड.व्ही.एल.पाटील, ज्येष्ठ विधी तज्ञ अँड. ए. एच.गुजराथी , अँड. व्ही.एस.भामरे, अँड.एस.एन.जाधव, अँड.व्ही.व्ही.सोनवणे, अँड. एम.बी.मराठे, अँड.ए.व्ही.शेख, अँड.एम.डी.सोनवणे, अँड.विनोद पाटील, अँड.अरविंदकुमार मंगासे, अँड.सी.एस.कोळपकर, अँड. हर्षल अहिरराव, अँड. प्रशांत जाधव, अँड.चंद्रकांत बैसाणे, अँड.पी.एस.परदेशी , अँड, शाहबाज शेख, अँड. व्ही.एस.पाठक , अँड. बोरसे, अँड.बी.बी.मराठे अँड. सौ. एस.एम.मराठे , अँड.ज्योत्स्ना पारधी आदी उपस्थित होते.
यावेळी दिवाणी न्यायाधीश ए.बी.तहसिलदार यांनी नागरिकांना कायदेविषयी माहिती दिली. 12 नोव्हेंबर या दिवशी होणाऱ्या लोकन्यायालयात कौटुंबिक वाद, किरकोळ फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे आपापसात तडजोड करावी. याने वेळेची,पैश्यांची देखील बचत होईल. होणाऱ्या वेदनाही थांबतील. यामुळे न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणे देखील कमी होतील. आयुष्यात आपल्या विरोधका बरोबर ही सुसंवाद सुरु ठेवावा. प्रत्येक माणसाने आलेल्या परिस्थितीशी सामान्य पणे केलेला विचार त्यातून मिळालेले उत्तर हे कायदेशीर असते. अशी माहिती दिली.
यावेळी शिंदखेडा न्यायालयाचे कनिष्ठ लिपिक अनिल आहुजा, वरिष्ठ लिपिक मिलिंद पवार,आर.बी.महाले, लघुलेखक राजेश सोनवणे , कनिष्ठ लिपिक मुराद शहा,पी.आर.बोरकर,के.व्ही.मिठसागर,जी.एन.मराठे, अरुण तमखाने, मयुर राजपूत,देव जोशी, विजय बाविस्कर आदी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अँड. व्ही.एल.पाटील यांनी केले. जनजागृती कार्यक्रम व रॅली यशस्वितेसाठी शिंदखेडा वकील संघाचे पदाधिकारी व न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ह्यासाठी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक, प्रशांत गोरावडे, मिलिंद पवार सह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.


0 Comments