महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती तर्फे वलवाडी स्थित कार्यालयात पक्षी मित्र डॉक्टर सलीम अली व पक्षी -तज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या जयंतीनिमित्ताने शासना तर्फे ५ ते १२ नोव्हेंबर पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताह अंतर्गत पक्षी बचाव अभियान या कार्यक्रमाचे उद्घाटन निसर्ग मित्र समितीचे राज्य महासचिव संतोषराव आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष
प्रेमकुमार अहिरे व से नि विस्तार अधिकारी ( आरोग्य)तथा योग शिक्षक पी आर जोशी,यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला, यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते वृक्ष पूजा करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच पक्षी सप्ताह निमित्ताने अनेक मान्यवरांनी पक्षांविषयी मनोगत व्यक्त केलीत, पक्षी पर्यावरणाचा प्रमुख घटक असून पक्षी संवर्धन करणे काळाची गरज आहे तरी आपण सर्वांनी पक्षी संवर्धनाच्या राष्ट्रीय व महत्त्वाच्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले,यावेळी चिमणी ,बगळा ,कावळा बदक ,राजहंस कबूतर, गरुड, सुगरण घार ,साळुंखी, टिटवी मोर, घुबड, निळकंठ, खंड्या,सुतार पक्षी, करकोच,अशा विविध प्रकारच्या पक्षांविषयी मनोगत व्यक्त करण्यात आलीत, यावेळी निसर्ग मित्र समिती चे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निसर्ग मित्र समितीचे मालेगांव तालुकाध्यक्ष प्रा दिपक देशमुख,धुळे तालुका सचिव प्रा जयवंत भामरे धुळे तालुका संघ़़टक तथा गोंदूर गावाचे माजी उपसरपंच चेतन भदाणे निसर्ग मित्र समितीचे सिंदखेडा तालुका संपर्कप्रमुख सुधीर सनेर,आदर्श शिक्षक अर्जून वानखेडे सर सामाजिक कार्यकर्ते सुरेश बैसाणे, आदर्श शिक्षक दिलीप पाटील निसर्ग मित्र महिला समितीच्या संघटक तथा आदर्श शिक्षिका भारती भदाणे आदर्श शिक्षक सुनील पाटील, आदर्श शिक्षक ,ईश्वर बैसाणे यांनी विशेष परिश्रम घेतले अशी माहिती जिल्हाध्यक्ष डी बी पाटील व जिल्हा सचिव विश्वासराव पगार यांनी पत्रकॉन्वये दिली आहे.

0 Comments