तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. ह्यावेळी कै कोमल सिंग नाना परमार, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल व गटनेते अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक चेतन परमार यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपल्या वार्डातील विविध विकासोविमुख कामे,
गोरगरिबांना मदतीचा हातभार,सुख दुःख ची कामे केली आहेत म्हणून आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करीत असतांनाच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या हस्ते केले. हयाप्रंसगी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले भिला पाटील युवराज माळी उल्हास देशमुख बाळासाहेब गिरासे, मनोहर पाटील, शहराध्यक्ष प्रवीण माळी, ह.भ.प.उद्धवशास्री महाराज, नगरसेवक अँड विनोद पाटील, उदय देसले, चंद्रकांत गोधवाणी, माजी प्राचार्य प्रदीप दिक्षित, प्रा.परमार, योगेश कासार, संदीप कासार, हर्षल भामरे, दिपक सोनार आदि उपस्थित होते तर पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे वैष्णवी चेतन परमार या मुलीनं आपल्या वडिलांच्या वाढदिवसाला रक्तदान करून ऋण व्यक्त केले. महिलांनी देखील रक्तदान केले. शिबिर साठी नवजीवन ब्लड ग्रुप धुळे यांचे योगदान लाभले. यशस्वी तेसाठी कै.कोमलसिंग नाना प्रतिष्ठान, योगेश्वर मित्र मंडळ, महात्मा फुले प्रतिष्ठान,शनेश्वर मित्र मंडळ, क्षत्रिय मित्र मंडळ यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



0 Comments