शिंदखेडा (यादवराव सावंत प्रतिनिधी)- देशातील प्रत्येक गावात जेष्ठ नागरिक संघ असावे परंतु वृद्धाश्रम नसावे असे प्रतिपादन दोंडाईचा येथील जेष्ठ नागरिक संघ कार्यालयात आयोजित कायदेविषयक शिबीर कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश, दोंडाईचा श्री. अविनाश क्षीरसागर यांनी केले. जेष्ठ नागरिक कायदा आला हे खरंच दुर्दैवी घटनेची सुरुवात झाली. कारण जेव्हा जेव्हा समाजामध्ये विशिष्ट प्रकारचे दोष निर्माण होतात. गुन्हे घडतात. तेव्हा कायदे करण्याची गरज निर्माण होते. असे कायदे करण्याची गरज का? निर्माण झाली. तर गोष्टीला नवीन पिढी ही कारणीभूत असल्याचे मत न्यायाधीश श्री. क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात दि. 11 नोव्हेंबर रोजी तालुका विधी सेवा समिती, शिंदखेडा अंतर्गत दोंडाईचा व वकील संघ दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश श्री अविनाश क्षीरसागर हे होते. प्रमुख पाहुणे जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष एस.पी. गिरासे, आई- वडील संघ नंदुरबार अध्यक्ष बारकू पाटील, जेष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष सुरेश निंबाजी चौधरी , सचिव सुरेश ढोमन बोरसे, सौ अरुणा चंद्रात्रे, हिरालाल चौधरी, सोमनाथ भावसार, छोटू सोनार, शिवदास पिंपरकर, अँड. एन.पी. अयाचित, अँड. पी. जी. पाटील, अँड. डी. व्ही.पाटील, अँड. ए. डी. पाटील, अँड. एम.जी.शाह, अँड. जे. व्ही. तायडे , अँड. जे.जे.वाघेला, अँड. आर. एच. धनगर, न्यायालयाचे सहायक अधीक्षक आर.एम चव्हाण उपस्थित होते.
यावेळी अँड. एन.पी. अयाचित, अँड.पी. जी. पाटील, अँड. ए. डी. पाटील, आई- वडील संघाचे अध्यक्ष बारकू पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश चौधरी यांनी तर आभार अँड. डी व्ही पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी न्यायालयाचे कर्मचारी दिपक कोळी, अनुप कुलकर्णी व योगेश बोरसे यांनी परिश्रम घेतले.

0 Comments