शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी -- तालुक्यातील बेटावद येथे
एसबीसी 3, जिल्हा प्रशासन नेहरू युवा केंद्र संघटन यांच्यामार्फत नुकतेच बेटावद या गावात बालविवाह प्रतिबंध या विषयावर पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
बालविवाह हा समाजामध्ये एक गंभीर विषय बनला आहे, त्यांचसंदर्भात पथनाट्याच्या माध्यमातून युवकांनी लोकांना या बालविवाह कशापद्धतीने रोखता येईल हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमास युनिसेफ जिल्हा समन्वयक नंदू जाधव, नेहरू युवा केंद्र संघटन जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार मेघवाल यांच्या मार्गदर्शनात हा पथनाट्य सादर करण्यात आला. यावेळी योगाचार्य जितेंद्र महाराज, अज्जू जाधव, दिनेश बंजारा, जितेंद्र राठोड, सचिन जाधव, मुकेश जाधव, रोहित जाधव, लखन जाधव, गोपाल जाधव, ऋतिक जाधव, नारायण जाधव, राहुल राठोड, विश्राम जाधव आदी युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. हा पथनाट्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि नागरिक उपस्थित होते. सदर पथनाट्य पाहुन नागरिकांनी समाधान व्यक्त केला.


0 Comments