Header Ads Widget

अमळनेर तालुक्यातील बोहरे गावात भिला बहिरम मढी सोबतच गरजु व हुशार विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकाही बांधण्याचा निर्धार


 

अमळनेर- तालुक्यातील तापी काठावर असलेल्या बोहरे गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी बापूसाहेब आसाराम सोमा धनगर यांनी आपल्या शेतात भिला बहिरम मढीच्या बांधकामाला आजपासून सुरुवात केली असून भविष्यात नियोजित असलेल्या गरजू व हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासिकेसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांनाअभ्यासिकेचा लाभ मिळणार आहे.

नियोजित मढी व अभ्यासिकेच्या बांधकामासाठी समस्त समाज बांधवांनी आर्थिक मदत करून कार्य करण्याचा संकल्प केला आहे. (भगत) गोकुळ बाविस्कर , आधार धनगर , राजेंद्र कोळी , चंद्रभान कोळी ,( भोप्या ) हिरालाल  मनोरे, भिकन धनगर , गोविंदा धनगर, सचिन कोळी , (समाजसेवक) नथ्थु धनगर,राजेंद्र धनगर उत्तम धनगर, रूपचंद धनगर ,चैत्राम धनगर ,वसंत धनगर , विजय धनगर, रतन धनगर, हिरामण धनगर, भावलाल धनगर , पोपट धनगर, फकिरा, सोपान धनगर, गोपाळ धनगर, प्रशांत धनगर, प्रवीण धनगर, पंकज धनगर , भूषण धनगर, संजय धनगर , शुभम धनगर, कैलास धनगर, सुकलाल धनगर , गणेश धनगर , पांडुरंग धनगर , सुनील धनगर , रवींद्र धनगर आणि  समस्त धनगर समाज व बोहरे  ग्रामस्थ यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या ..  भिला बहिरम मढी सोबतच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचाही प्रश्न सुटणार असल्याने आसाराम बापू धनगर आणि त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांच्या समाज बांधवाच्या व ग्रामस्थांच्या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीत स्वागत होत आहे.


Post a Comment

0 Comments