Header Ads Widget

* सोनवद धरणातून पाणी सोडा =प्रकाश पाटील. *.




,,__________________________________________      डोंगरगाव  (प्रतिनिधी)  आर आर पाटील. = डोंगरगाव जवळ महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून सोन वद  धरण हा मध्यम प्रकल्प पूर्ण केलेला असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या धरणात पाण्याचा शंभर टक्के पाणीसाठा गोळा झालेला आहे या पाण्यावर सुमारे 2147 हेक्टर शेत जमिनीचे सिंचन अवलंबून आहे डोंगरगाव सह कचनपूर वालखेडा वाघाडी बुद्रुक कलमाडी वाघोदे आजंदे इत्यादी गावांच्या शेतजमीनींला  या पाण्याचा उपयोग होतो सध्या परिसरात रब्बीची पेरणी जोरात सुरू असून सर्वच शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्रोत म्हणून विहीरी बोरवेल वगैरे नाहीत म्हणून रब्बी पिके घेण्यासाठी सोंनवद च्या पाण्याची आवश्यकता त्यांना  आहे म्हणून सध्या रब्बी पेरणी योग्य वातावरण असल्याने पाणी सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे म्हणून परिसरातील शेतकऱ्यांसह जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील यांनी सोनवद धरणातून पाट चाऱ्या साफसफाई करून तातडीने पाणी सोडावे अशी मागणी केलेली आहे या संदर्भात प्रकाश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी केल्याचे समजते

Post a Comment

0 Comments