शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी-- तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस पाटलांची आज शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, एपीआय प्रशांत गोरावडे, पीएसआय मिलिंद पवार यांच्या उपस्थितीत
आगामी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुका बाबत पोलीस पाटलाची बैठकीच्या आयोजन करण्यात आले होती यावेळी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना सुनील भाबड यांनी पोलीस पाटलांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील छोटे-मोठे तंटे तसेच वाद विवाद उद्भवतील, असे अशा घटना गावात घडू नये यासाठी पुढाकार घेऊन गावात शांतता आबाधीत राहावी यासाठी पोलीस पाटलांनी दक्ष राहून पोलीस पाटलांनी गावात निवडणुकी काळात प्रचार व प्रसार कामात तटस्थ भूमिका घेऊन गावातील बारीक-सारीक गोष्टीवर लक्ष केंद्रित ठेवून कशा पद्धतीने शांततेत निवडणूक पार पाडावी गावात काही अपरिचित प्रकार घडत असेल तर लगेच कळवा कुणी कायदा हातात घेत असेल तर त्याला, पोलीस स्टेशनची संपर्क साधून, गावातील कायदा सूवसथा अबाधित राहावे यासाठी पोलीस पाटलांनी प्रयत्न करावे तसेच मतदान काळात पोलीस पाटलांनी कशी भूमिका बजावी याबाबत मार्गदर्शन केले,यावेळी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड प्रशांत गोरावडे , मिलिंद पवार पोलीस पाटील संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील, युवराज माळी आप्पा ढीवरे, भाऊ परदेशी,गणेश गिरासे चरण सिंग गिरासे प्रदीप गिरासे गणेश गिरासे मनोहर भदाने भैया नगराळे कृष्णा पाटील जितेंद्र पाटील छोटू,पाटील,अनिता पाटील मानसी पाटील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते


0 Comments