शिरपूर तालुक्यातील सा बां उपविभाग क्र 2 अंतर्गत गिधाडे गावापासून ते सावळदे फाटा रस्ता अंत्यत निकृष्ट , दयनीय झाला होता वाहन चालविणे जिकरीचे झालेले होते. सदर रस्त्यांवर खड्डेच खड्डे होते. वाहन कोठून व कसे चालवावे हे उमजत न होते.लहान मोठे अपघात घडत होते नेहमी प्रवास करणारे वाहन धारकांचे मनक्यांचे विकार वाढले होते अशी परिस्थिती असतांना साप्ता स्वराज्य मित्र चे संपादक धनराज व्ही. निकम , विनोद चौधरी सामाजिक कार्यकर्ते यांनी ईमेल व सोशल मीडिया द्वारे मा भोसले साहेब , सा बा प्रा विभाग नाशिक यांच्या कडे पुरावासहित तक्रार केली होती. त्यांची दखल घेत त्यांनी सुव्यवस्थित रस्ता करण्याचे आदेश झाल्याने तक्रारीच्या अनुषंगाने आजघडीला वाहतुकीस योग्य असा रस्ता तयार झाला आहे. शेवटी तक्रारीस न्याय मिळाल्याची भावना जनमानसात तयार झाली आहे
सोबत पूर्वीचे व आताचे व्हिडीओ चित्रीकरण
धनराज व्ही निकम rti ऍक्टिव्हिस्ट , संपादक स्वराज्य मित्र ,
विनोद चौधरी
सामाजिक कार्यकर्ते
शिंदखेडा

0 Comments