*राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष, व देशाचे जाणते नेतृत्व आदरणीय शरद पवार साहेब यांचा वाढदिवस पक्षाध्यक्ष श्री जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार व धुळे जिल्हा निरीक्षक श्री अर्जुन जी टिले साहेब जिल्हाध्यक्ष श्री सुरेश आण्णा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ,तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धुळे येथील शासकीय विद्यानिकेतन मधील साधारणतः १०० ते १२५ गरीब विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप करून साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यधक्ष श्री रणजित राजे भोसले,सह माजी नगरपालिका शिक्षण मंडळ अधिकारी श्री महेन्द्र जोशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र चितोडकर,राष्ट्रवादी ग्रामीण सेवादल जिल्हाध्यक्ष मंगेश तात्या जगताप उपाध्यक्ष भिका भाऊ नेरकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या वतीने सर्वश्री सौ ठाकूर मॅडम, सावले सर, दासवडकर सर, विभांडीक सर,बोरसे मॅडम व सर्व शिक्षक वृंद यांनी केले होते.संस्थेस व विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांचा उहापोह या वेळी कथन करण्यात आला व पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले .श्री मंगेश तात्या जगताप श्री महेन्द्र जोशी,तालुकाध्यक्ष राजेन्द्र चितोडकर व धुळे महानगर शहराध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केलेत.भविष्यातील वाटचालीत आपल्या अडचणी निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सोबत राहीन असे आश्वासन श्री रणजित राजे भोसले यांनी केले,शिस्तप्रिय विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कालिका इंडस्ट्रीज धुळे यांचे अनमोल सहकार्य लाभले
0 Comments