सोनगीर---धुळे जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारूचा वापर केल्या जाण्याची शक्यता आहे. यात धुळ्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनगीर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत सोनगीर टोलनाका येथून वाहनामध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सोनगीर पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सोनगीर टोलनाका या ठिकाणी सापळा रचला.
यादरम्यान माहिती मिळालेले वाहन पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ वाहनाला थांबून तपासणी केली. त्यामध्ये देशी दारूने भरलेले 30 बॉक्स पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान एकाला ताब्यात घेतले असून कारवाईत जवळपास सहा लाख 9 हजार 440 रुपयांचा मुद्दामाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील कारवाई सोनगीर पोलीसांतर्फे करण्यात येत आहे.

0 Comments