Header Ads Widget

*“मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा” आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे “महाराष्ट्र आणि मराठा राज्य करावे जिकडे तिकडे”..!*



 
धुळे - वरील ओळींप्रमाणे आज मध्य प्रदेश इंदोर येथील युवा उद्योजक प्रेम मराठे यांनी वातानुकूलित AC इंदोर धुळे इंदोर बस सेवा सुरू केली. त्यांनी यावेळी धुळे जिल्हा क्रांती मोर्चा चे अध्यक्ष श्री मनोज भाऊ मोरे आणि श्री निलेश काटे यांच्याशी संपर्क साधत सदर बस सेवेचा आपण शुभारंभ करावा अशी फोनवरून विनंती केली. या विनंतीला मान देऊन आज धुळे बस स्थानक येथे धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने इंदोर धुळे इंदोर या वातानुकूलित बससेवेचे धुळेकरांच्या सेवेत उद्घाटन करण्यात आले. या शुभ प्रसंगी धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोज मोरे, निलेश काटे, मराठा पंचमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे, संजय वाल्हे, हनुमंत अवताडे, अमर फरतडे, नाना कदम, सौ. लीना निलेश काटे, वाल्मीक मराठे, भैय्या रावळे, देवेन शेळके, जितेन्द्र पाटील, मनुकुमार भाऊ आदि मान्यवर उपस्थित होते..!

निलेश काटे
धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा
एक मराठा लाख मराठा

Post a Comment

0 Comments