देशाचे जाणते नेते तसेच महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी महाराष्ट्राचे मा.उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते आदरणीय श्री. अजित दादा पवार तसेच मा. जलसंपदा मंत्री तसेच प्रातांध्यक्ष आदरणीय श्री. जयंतरावजी पाटील साहेबांच्या हस्ते *महाराष्ट्रातील ८२०* ग्रंथालयांना *शरद स्पर्धा परीक्षा संच* वाटपाचा श्रीगणेशा करण्यात आला..
तसेच यशवंतराव प्रतिष्ठान मुंबई येथे आदरणीय साहेबांचे *"लोक माझी सांगती "* या पुस्तकांचें वाटप *ग्रंथालय विभागाचे मा. प्रदेशाध्यक्ष श्री.उमेश दादासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून* महाराष्ट्रातून आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यास पक्षाचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांना *राष्ट्रवादी ग्रंथालय विभागातर्फे* वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री उमेश दादासाहेब पाटील, तसेच प्रदेश समन्वयक व महाराष्ट्र शासन ग्रंथालय राज्य नियोजन समिती सदस्य सौ.रिताताई बाविस्कर, ग्रंथालय विभागाचे धुळे जिल्हाध्यक्ष श्री. दिपक जगताप, रायगड जिल्हाध्यक्ष श्री. प्रवीण रणावरे, नवीमुंबई जिल्हाध्यक्ष श्री. ललित सांळुखे, प्रदेश चिटणीस सौ.पार्वतीताई पवार, युवा कार्यकर्ते श्री. अक्षय पाटील, शिंदखेडा शहराध्यक्ष श्री. हर्षदीप वेंधे तसेच पदाधिकारी उपस्थित होते..
आपला
दिपफकराव पी.जगताप जिल्हाध्यक्ष- रा.काॅं. पक्ष ग्रंथालय विभाग.धुळे ग्रामिण.

0 Comments