Header Ads Widget

* सोनवद धरणातून पाणी सोडले. *.

         
        
___________________________________________        डोंगरगाव (प्रतिनिधी  )आर आर पाटील_  दि 19 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद खलाने गटाचे सदस्य पंकज कदम यांच्या हस्ते पूजा करून व प्रवीण मोरे प स सदस्य शाखा अभियंता जेडी खैरनार सोनवद व जामफळ धरण कृती समिती अध्यक्ष किशोर रंगराव पाटील जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील माजी सरपंच अशोक पाटील पत्रकार आर आर पाटील यांच्या उपस्थितीत सोनवद धरणातून आज शेतीला पाणी सोडण्यात आले हे धरण 100% पाण्याने भरलेले असून 2147 हेक्टर शेत जमिनीचे सिंचन यावर होते रब्बी हंगामात या परिसरात गहू हरभरा मका ज्वारी बाजरी भुईमूग ऊस केळी भाजीपाला इत्यादी विविध पिकांची पेरणी व लागवड झालेली आहे या पाण्यामुळे एकूणच शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी शेती पाण्याचा प्रश्न सुटू शकतो यावेळी पंकज कदम यांचे समवेत प्रकाश पाटील अशोक पाटील आर आर पाटील कांतीलाल पाटील ईश्वर पाटील नंदलाल पाटील संजय पाटील शिंदे पाटकरी कालवा निरीक्षक प्रकाश गवांदे पंकज माळी कैलास पाटील उपसरपंच कचनपूर रवींद्र अहिरे वालखेडा लक्ष्मण माल चे सरपंच वालखेडा भारत साहेबराव कोली इत्यादी शेतकरी ग्रामस्थ व राजकीय नेते मंडळीवअधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments