Header Ads Widget

ना. गडकरिंनी श्री. राधाक्रुष्ण प्रेम मंदिर संस्धानचे आमंत्रण स्विकारले. """""""""""""""महेशबाबा घुगे.




      धुळे जिल्ह्यातील , सिंदखेडा तालुक्यातील, तामथरे या छोठ्याशा गावातील मोठ्या मनाच्या माणसाकरवी, श्री राधाक्रुष्ण प्रेम मंदिर विश्वस्थ 
मंडळाद्वारे, तामथरे गावातील, 


श्री. राधाक्रुष्ण प्रेम आश्रमाच्या भव्य दिव्य परिसरात,  भव्य दिव्य ,आगळ्या वेगळ्या प्रकारच्या , सुमारे बारा कोटी रुपये खर्चा च्या श्री राधाक्रुष्ण  मंदिराची ऊभारणी केली जात आहे. 
          या संक्लपीत मंदिराच्या भूमीपुजनाला केंद्रीय मंत्री ना नितीन गडकरी यांनी यावे व त्यांच्या हस्ते या मंदिराचे भूमिपूजन केले जावे या येतूने काल दि. 18- 12- 2022 रोजी
श्री राधाक्रुष्ण प्रेम मंदिर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. महेंद्र महाराज राजपूत यांनी, या विश्वस्थ मंडळाचे सचिव श्री. विलास कोठावदे, देवेंद्रदादा रावल, कोमलसिंह भाऊसाहेब, चेतनजी ततार, एम जी नाना पाटील, आदिसह ईगतपुरी येथे
ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन , त्यांना, मंदिराच्या भूमी
पूजनाचे निमंत्रण दिले. 
       श्री. राधाक्रुष्ण प्रेम मंदिर आश्रम आणि मंदिराच्या कामांचा संक्लप , ऐकूण ना. गडकरी प्रभावित झाले. " अशा पवित्र कामाला येणे मला आवडेल मी नक्की येतो, " अशा शब्दात त्यांनी निमंत्रण स्विकारले. 
          गेल्या 13- 12- 2022  पासून श्री. राधाक्रुष्ण प्रेम मंदिर आश्रमाच्या प्रांगणात, प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही हरिनाम सप्ताह सुरू असुन, महाराष्ट्रातील
नामाकिंत किर्तनकारांची लोक प्रबोधनात्मक  किर्तने संपन्न होत आहेत 
           आज दि. 19- 12- 2022 रोजी काही मान्यवराच्या प्रमुख ऊपस्थितीत. ह. भ. प. इंदुरीकर महाराजांचे प्रभावशाली किर्तन संपन्न होणार आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन सर्वश्री
ह.भ.प. महेंद्र महाराज राजपूत, महेशबाबा घुगे, विलासभाऊ कोठवदे, आदी मान्यवरांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments