दोंडाईचा- येथे बेटी बचावो बेटी पढावो कार्यक्रम अंतर्गत आज दि.२/१२/२०२२ शुक्रवारी सकाळी ९ वा. दादासाहेब रावल स्टेडियम दोंडाईचा मध्ये धुळे ग्रामीण विभागातर्फे मुली व महिलांसाठी स्वसंरक्षण प्रक्षिक्षण शिबीर चे उदघाटन होणार असून कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, नाशिक शहर आमदार देवयानी फरांदे, बेटी बचावो बेटी पढावो, महाराष्ट्र प्रदेश संयोजिका शुभा पाध्ये - फरांदे, मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशीं, माजी लोकनियुक्त नगरअध्यक्षा नयनकुंवर रावल. पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, बेटी बचाव बेटी पढावो महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मृणालिनी बागल राहणार असून, कार्यक्रम मध्ये शहर व परिसरातील मुली व महिला यांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे व आत्म संरक्षण प्रक्षिक्षण शिबीर चा लाभ घ्यावा असे आवाहन बेटी बचाव बेटी पढावो च्या धुळे ग्रामीण च्या संयोजक चंद्रकला सिसोदिया, दोंडाईचा शहराचे संयोजक भिमलिंग लिंभारे, शहरातील पदाधिकारी मयुरा पारख, अशोक चौधरी, प्रेरणा सोलंकी, ज्योशना पवार यांनी केले आहे.
0 Comments