Header Ads Widget

जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धा आयोजन..



..
नरडाणा-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,धुळे व विकास विद्यालय व कला,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,नरडाणा यांच्या संयुक्त 


विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे उद्घाटन नरडाणा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सौ.शिवप्रिया सिसोदे व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात 




आले.यावेळी विकास विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अविनाश कोतकर,कै.बाळासाहेब डी.बी.सिसोदे इंग्लिश मेडियम स्कूलचे प्राचार्या जयश्री पवार हे उपस्थित होते.या डॉजबॉल स्पर्धेचा निकाल  १९वर्षे वयोगटातील मुले / मुली  संघ विजयी विकास विद्यालय,नरडाणा व १७वर्षे वयोगटातील मुलांचा संघ विजयी संघ विकास विद्यालय,नरडाणा मुलींचा  विजयी संघ मुक्तांगण हायस्कूल,बोरकुंड  या संघाची विभाग स्तरावर निवड झाली आहे.स्पर्धेचे आयोजन डॉ.आनंद पवार यांनी केले होते.तसेच पंच म्हणून अक्षय हिरे,छोटू कोळी,वर्षा महाजन, रोशनी पाटील,राहुल सपकाळे,डिगंबर भामरे,सचिन भामरे, महेश सिसोदे, संकेत वाकडे, शिवम शिरसाठ, राहुल पाटील, वेदांत पाटील,अमोल जाधव यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments