Header Ads Widget

*नरडाणा महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा*



     धुळे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय धुळे तथा म. दि. सिसोदे कला, वाणिज्य, सायन्स महाविद्यालय नरडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष मा. संजयकुमार सिसोदे होते. एकात्मिक समुपदेशन केंद्र, ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथील समुपदेशक श्री. नरेंद्र देवरे, लॅब टेक्निशियन श्री. अतुल ठाकरे, तसेच सप्तश्रुंगी बहुउद्देशीय महिला संस्थेचे श्री. झेलर पावरा, श्री. निलेश बैसाणे, श्रीमती छाया भदाणे, श्रीमती ललिता पाटील यांची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांचे स्वागत मा. संजयकुमार यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. जी. सोनवणे रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी केले. रासेयो चे सर्व विद्यार्थ्यांना नरेंद्र देवरे यांनी एड्स वर व्याख्यान देऊन एड्स विषयी शपथ ग्रहण करायला लावली. एड्स विषयी जन जागृती यात विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान असावे असे ही त्यांनी सांगितले. यावेळी आदरणीय प्राचार्य डॉ. समाधान पाटील प्रा. एस पी. ढाके,प्राध्यापक वृंद रासेयो चे विद्यार्थी हे उपस्थित होते. सर्व प्रमुख अतिथी यांचे आभार प्रा. दत्तात्रय धिवरे सहाय्य्क कार्यक्रम अधिकारी यांनी मानले. नरडाणा महाविद्यालयात एड्स दिनचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments