श्री.सी.जी.वारूडे(प्रतिनिधी)
शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयातील १७वर्षाखालील मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय शालेय खो खो क्रीडा स्पर्धेत नुकतेच जिल्हा उपविजेता यश संपादन केले.
सविस्तर वृत्त असे की,जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयामार्फत धुळे शहरातील साक्री रोडवरील तालुका क्रीडा संकुलात (गरूड मैदान) ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तरीय १७ वर्षाआतील मुले,मुलींच्या शालेय खो - खो क्रीडा स्पर्धा दिनांक- २ डिसेंबर २०२२ रोजी संपन्न झाल्या.सदर स्पर्धेत शिदखेडा तालुक्यातील कलमाडीच्या माता तुळजाभवानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित अगस्तमुनी माध्यमिक विद्यालयातील १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने साक्री तालुक्यातील म्हसदीच्या संघाला नमवून उपविजेतेपद प्राप्त केले. जिल्हा क्रीडाधिकारी आदरणीय आसारामजी जाधव साहेब,शिंदखेडा तालुका क्रीडा विस्तार अधिकारी ताईसो.रेखाजी मॅडम, राष्ट्रीय खेळाडू गुड्डभाऊ अहिरराव, जिल्हा क्रीडा महासंघाचे सचिव पंढरीनाथ बडगुजर, कला व क्रीडा महासंघाचे अध्यक्ष हेमंत भदाणे, कोषाध्यक्ष योगेश वाघ, विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय, आबासो.श्री.एस.ए.कदम सर आदिंनी उपविजेत्या संघाचे अभिनंदन केले. संघ व्यवस्थापक श्री.सी.जी.वारूडे, जे.डी.चव्हाण यांना मान्यवरांचे मनोभाव मार्गदर्शन लाभले व विजयी - उपविजयी मुलींच्या संघाचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले.
तसेच वरील जिल्हा उपविजेता संघाचे व क्रीडा मार्गदर्शक शिक्षकांचे - संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय,आबासो.श्री.जे.बी.पाटील,
शिंदखेडा तालुका गटशिक्षणाधिकारी आदरणीय डाॅ.आण्णासाहेब श्री.सी.के.पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक-आदरणीय आबासो.श्री.एस.ए.कदम,केंद्र प्रमुख नानासाहेब.श्री.आर.जी.राजपुत,सरपंच ताईसो.सौ.मालुबाई शिवाजीराव कदम,पोलीस पाटील श्री.भाऊराव पाटील,खलाणे गटाचे माजी,आजी जि.प.सदस्या ताईसो.सौ.सोनाली युवराज(पंकजभाऊ)कदम,ग्राम.पंचायत सदस्य मंडळी,संचालकमंडळी,
पालकवर्ग,ग्रामस्थ मंडळी शिक्षक-
शिक्षकेत्तर वृंद,व पंचक्रोशीतील क्रीडा मित्र परिवार या सर्वांकडून शब्द सुमनांनी जिल्हा उपविजेता मुलींच्या संघाचे व संघ व्यवस्थापक क्रीडाशिक्षकांचे अभिनंदन करण्यात करून आले.
👍🏽👍🏽🌹🌹💐💐💐💐💐


0 Comments