Header Ads Widget

अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी येथील विद्यालयात नुकताच ज्ञानसूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 'महापरिनिर्वाण दिन' साजरा



श्री.सी.जी.वारूडे (प्रतिनिधी) 
      शिंदखेडा तालुक्यातील अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी येथील विद्यालयात नुकताच ज्ञानसूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 'महापरिनिर्वाण दिन' साजरा करण्यात आला.
       यावेळी या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एस ए कदम यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व कार्यक्रम प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
       यावेळी प्रथमतः विद्यार्थींनी गीत गायन माध्यमाने विनम्र अभिवादन करण्यात आले.
       तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवन चरित्राची व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची माहिती तसेच अथक परिश्रमातून तयार केलेला राज्यघटनेचा इतिहास व त्यातून तयार झालेल्या  संविधानाची माहिती तसेच महाडचा सत्याग्रह,दीन दलितांमध्ये शिक्षण जागृती,
बहिष्कृतभारत,उन्नतीचे मूलमंत्र इ.शेवटी डाॅ.बाबासाहेबांनी संदेश देतांना म्हणाले होते की,"देशाला स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत लढले पाहिजे". असा हा अमर संदेश आपणास देवून गेलेत व "सुसंस्कृत मन शिक्षण ही स्वातंत्र्याची प्रेरक शक्ती मानते",तसेच "शिक्षण हे माणसाला विचार देते" व "शिक्षण हे पवित्र आहे आणि त्याचे पावित्र्य राखण्याची नितांत गरज आहे" इ.विषयीमाहिती मा.मुख्याध्यापक श्री एस .ए .कदम यांनी  आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर समोर मांडले.
       यावेळी कार्यक्रमास विद्यार्थीवर्ग,
शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.
व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन -  श्री.एस.बी.भदाणे यांनी केले व आभार-श्री.सी.जी.वारूडे यांनी मानले.व कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेतर बंधू परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments