शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ज्ञान सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती एम.डी बोरसे,
यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षक श्री उमेश देसले ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस एस बैसाने वरिष्ठ लिपिक श्री किशोर पाटील आदी उपस्थित होते
याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवन चरित्राची व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची माहिती तसेच अथक परिश्रमातून तयार केलेला राज्यघटनेचा इतिहास व त्यातून तयार झालेल्या संविधानाची माहिती पर्यवेक्षक श्री उमेश देसले व श्री एस .ए .पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर समोर मांडली कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनींना परिश्रम घेतले.


0 Comments