शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथील अगस्तमुनी माध्य.विद्यालयात "बेटी बचाव बेटी पढाव" मेळावा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आबासो.श्री.एस.ए.कदम व प्रमुख पाहुणे श्रीमती वंदना पाटील (अंगणवाडी सेविका)व श्रीमती मनिषा पाटील (आरोग्य आशा स्वयंम सेविका),श्रीमती बी जे कदम (उपशिक्षिका) उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी आपापली मनोभाव व्यक्त केलेत.
तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक श्री.एस.ए.कदम यांनी म्हटले की, " जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उध्दारी " तर मुलगी ही दोन घरांचा उध्दार करत असते तर शिक्षणाविषयक व सुसंस्कृत संस्कार बाबत त्यांनी सावित्रीबाई फुले,सरोजिनी नायडू,लक्ष्मीबाई टिळक,भगिनी निवेदिता,साधनाताई आमटे,अनुताई वाघ,अरूणा आसफ अली,कल्पना चावला,सुनिता विल्यम्स,किरण बेदी,इंदिरा गांधी,प्रतिभाताई पाटील,द्रौपदीजी मुर्मू ,राजमाता जिजाऊ,झाशी राणी,अहिल्याबाईहोळकर,मदरतेरेसा, सिंधुताई सपकाळ,संत मुक्ताई,संत जनाबाई आदि महिलांचा कार्यत्वाचा आढावा व्यक्त करत आज ही समाजात महिला भगिनी विविध कार्यक्षेत्रात पुरूषांचा खांद्याला खांद्यावरून काम करत आहे,म्हणून मुलींनी स्वसंरक्षण व स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी चिकाटी,जिद्द,मेहनत,धैर्य,आत्मविश्वास,सामाजिक,बौद्धिक,मानसिक,भावनिक,सांस्कृतिक,शैक्षणिक इ.व स्त्रीभ्रूण हत्या थांबले पाहिजे व मुलींचे लग्न १८ वर्षांनी केले जावे, स्री शिक्षण इ.विषयी जनजागृती समाजात व्हावी. व मुलींनी स्वत:च्या आरोग्य विषयक समस्या आई,बहिण,मैत्रीण, शिक्षिका डाॅक्टर इ.व्यक्तिगत समस्यांचे निराकरण करणे इ.विषयक "बेटी पचाव व बेटी पढाव " मेळावा कार्यक्रम अंतर्गत किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक महत्त्व पटवून .
यावेळीस कार्यक्रमास विद्यार्थीनी वर्ग,शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-श्री.एस.बी.भदाणे यांनी केले तर आभार- श्री.पी.आर.पाटील यांनी मानले.


0 Comments