---------------------------
*धुळे-* *दि.२:* छत्रपती शाहू महाराजांच्या रक्ताचे खरे वारसदार ,धुळे शहरातील युवकांचे प्रेरणास्थान,श्रीमंत यशवर्धन बाबा कदमबांडे यांची शिवसेना युवा सेनेच्या राज्य सहसचिवपदी नुकतीच नियुक्ती झाल्याने आज त्यांचा धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी शाल पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. युवा सेनेचे राज्याचे नेते मा. श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांनी यशवर्धनजी कदमबांडे यांच्यावर विश्वास दाखवून हि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी टाकल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. त्या निमित्ताने धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चा तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे,मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते नानासाहेब बगदे,विकास भाऊ बाबर,श्रीरंग जाधव पहेलवान, मराठा क्रांती मोर्चाचे सचिव निंबा मराठे,संजय बगदे,मुन्ना आप्पा शितोळे, सहखजिणदार विरेंद्र मोरे,समन्वयक दिपकभाऊ रौंदळ, विनोद तात्या जगताप, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष हेमंत भडक, शहर विधानसभा संघटक शाभभाऊ निरगुडे,रजनीश निंबाळकर,सुनील ठाणगे,विशाल गवळी, हेमंत चव्हाण,वैभव पाटील, भुषण बागुल, आशिष देशमुख नंदुभाऊ अहिरराव,प्रफुल्ल माने, आदी मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते..

0 Comments