Header Ads Widget

दत्तात्रेय भगवान हेच सर्वार्थाने खरे दत्त प्रभु !




महानुभाव पंथात दत्तात्रेय प्रभूंना खुप महत्व आहे . तस बघितल तर महानुभाव पंथातील एकमुखी अर्थात प्राकृत असे दत्तात्रेय भगवान हेच सर्वार्थाने खरे दत्त प्रभु ! महानुभाव पंथीय लोक तिनमुखी दत्तात्रेय मानत नाहीत अस ऐकुन आहे . ते नित्य एकमुखी दत्तात्रेय प्रभुचीच उपासना करतात .

        मुळ एकमुखी दत्तात्रेय प्रभुचे ब्राम्हणीकरण करण्यात आले आणी काल्पनिक अनुसुयेची कथा निर्माण करत मुळ दत्तात्रेय प्रभूंना काउंटर करण्यासाठी तिनमुखी दत्ताची निर्मीती ब्राम्हणांनी केली . आजही ब्राह्मण पुजा करताना तिनमुखी दत्तात्रेयचीच पुजा करतात , एकमुखी दत्ताचा फोटो सुद्धा त्यांना चालत नाही हा माझा काही वर्षापूर्वीचा व्यक्तिगत अनुभव आहे . 

        मुळ दत्तात्रेय प्रभुंच स्वरुप बघितल्यास भगवे वस्र परिधान केलेले , पाठींमागे गाय आणी पायाशी चार कुत्रे अर्थात चार वेद अस आहे . भगव्या वस्राला भारतीय समाजव्यवस्थेत खुप महत्व आहे . भगवान बुद्धांचे चिवर भगवे होते . लिंगायत धर्मगुरु स्वामी बसवेश्वर महाराजांचे वस्र सुद्धा भगवेच . स्वामी बसवेश्वरान्नंतर स्वामी चक्रधरांनी महानुभाव पंथाची विचारधारा प्रस्थापित केली आहे . 

        ज्या चार वेदांना  हिंदु संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व दिले आहे , ते वेद कुत्र्यासम दत्तात्रेय प्रभुंच्या पायाशी लोटंगण घालताना दिसतात . अर्थात दत्तात्रेय प्रभुंन्नी वेद नाकारलेत असेच म्हणता येइल .   पाठीमागे गाय असण हे कृषीसंस्कृतीशी संबध अधोरेखित करतो . 

        जगदगुरु तुकोबारायांनी त्यांच्या एका अभंगात म्हटल आहे.

 " नका दंतकथा येथे सांगो कोणी ! 
    कोरडे ते मानी बोल कोण ! 
   अनुभव येथे पाहिजे साचार ! 
  न चलती चार आम्हा पुढे !!  
  वरि कोण मानी रसाळ बोलणे ! 
  नाही झाले मनी ओळखी तो ! 
 निवडी वेगळे क्षीर आणी पाणी ! 
   राजहंस दोन्ही वेगळाली !! 
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे ! 
येरा गबाळाचे काय काम ! 

            ह्या अभंगात तुकाराम महाराजांनी " न चलती चार आम्हा पुढे "  अर्थात वेदांत सांगितलेल्या दंतकथा आम्हाला सांगत बसु नका . अनुभव महत्वाचा आहे . ह्यासाठी चार वेदांचे खंडण करत त्यान्नी दुध आणी पाणी वेगवेगळे करणाऱ्या राजहंसाचे उदाहरण दिले आहे . सत्याचा अनुभव असणारा व्यक्तीच येथे चालेल .. येड्यागबाळांचे हे काम नाही असे तुकाराम महाराज म्हणतात . मुळ दत्तात्रेय प्रभुन्नी चार कुत्री अर्थात चार वेदांचे खंडण केल आहे , त्यांच्य पावलावर पाऊल तुकाराम महाराजान्नी सुद्धा चार वेद नाकारले आहेत हेच सिद्ध होतय . 

      दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर महराष्ट्रात असंख्य ठिकाणी जत्रा भरतात . मि मुद्दाम जत्रा हा शब्द ह्यासाठी वापरला आहे कि तो ग्रामीण भागातील संस्कृती अधोरेखित करतो . महाराष्ट्रातील जत्रोत्सव शक्यतो बहुजन समाजाच्या दैवतांच्याच नावाने भरवण्यात येत असतो . काळभैरव , मरीमाय , खंडोबा , पिरोबा इ. बहुजन दैवते आहेत . ह्यांच्या नावाने महाराष्ट्रातील असंख्य ठिकाणी जत्रा भरतात . ह्या जत्रेत ग्रामीण भागात राहणारे लोकांच्या नित्य जगण्याच्या साधनांची मोठ्याप्रमाणात विक्री होते . ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला लागणाऱ्या गृहपयोगी वस्तुंची विक्री आणी खरेदी मोठ्याप्रमाणावर होत असते . ह्या जत्रेत खाण्यापिण्याचे पदार्थ सुद्धा ग्रामीण भागातीलच असतात . गुळाची जिलेबी , गोडेशेव , चिवडा हे पदार्थ अत्यंत प्रसिद्ध आणी लोक सुद्धा अत्यंत आवडीने खातात . ग्रामीण भागातील जिवनमान सुखरुप चालावे , त्यांच्यात व्यवहार , देवाणघेवाण व्हावी ह्या उद्देश्याने जत्राप्रपंच असावा . कारण पुर्वीपासुन भारतीय खेडी शहरापासून खुप विलग आहेत . खर भारत खेड्यात आहे असे अनेक विचारवंत म्हणतात ते खोट नाही . 

       आमच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील कमळजा मातेचा जत्रोत्सव दत्तजयंतीच्या पुर्वसंध्येलाच होत असतो . तसेच पारोळा तालुक्यातील चोरवड येथे चक्रधर स्वामी महाराजांचे खुप प्रख्यात मंदिर आहे . दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर दत्तात्रेय प्रभुंच्या अनुयायांचा जणु मेळावाच इथ भरवला जातो . ही जत्रा बघण्यासारखी असते . दत्तजयंतीच्याच अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथी घोड्यांची जत्रा संपुर्ण भारताय अत्यंत प्रख्यात अशी आहे . देशभरातुन सारंगखेड्याच्या जत्रेत लोक घोडे खरेदी करण्यासाठी व बघण्यासाठी सुद्धा येतात . 

     आमच मुळ आम्ही शोधल पाहिजे आणी ते टिकवताही आल सुद्धा पाहिजे . अभ्यासाअंती अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो . 

स्वामी दत्तात्रेय प्रभु कि जय ! 
गोपाल कृष्ण भगवान कि जय ! 

- डॉ. चक्रधर साठे पाटिल,चोपडा !

Post a Comment

0 Comments