*शिरपूर : भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लोककल्याणकारी धोरणांवर आणि विकासकामांवर विश्वास दाखवत गुजरातच्या जनतेने पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने राज्यात कमळ फुलवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, गृहमंत्री शाह यांचे मार्गदर्शन आणि जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली मिळालेल्या या ऐतिहासिक विजयाबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील आणि गुजरात भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करत शिरपूरात भाजपा तर्फे जल्लोष करण्यात आला. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरातमधील जनतेने विश्वास दाखवला आहे. गुजरात मध्ये भारतीय जनता पार्टीने रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवल्या बद्दल शिरपूर भाजपा तर्फे वाजंत्री वाजून, फटाके फोडून व पेढे वाटुन जल्लोष करण्यात आला. यावेळी जल्लोष करताना भाजपा प्रदेश बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, तालुका सरचिटणीस जितेंद्र सुर्यवंशी, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, रोहित शेटे, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, शिरीष पाटील, अविनाश शिंपी, अनिल बोरसे, रविंद्र राजपुत, पंकज पाटील, रफीक तेली, नितीन राजपुत, रविंद्र सोनाल, अमोल पाटील सह तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.*

0 Comments