शिंदखेडा - श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शिदखेडा येथील विद्यार्थ्यांनी यावर्षीच्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा हस्थी पब्लिक स्कूल येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व आपल्या अंगी असलेले कौशल्य पणाला लावून त्यांनी यश संपादन केले. यामध्ये 14 वर्ष वयोगट असलेल्या मुलींमध्ये सलोनी ठाकरे हिने थाळीफेक मध्ये - प्रथम, 600 मीटर मध्ये - द्वितीय, गोळा फेक मध्ये - तृतीय क्रमांक पटकावला. तसेच 17 वर्षेयोगटातील मुलींमध्ये लक्ष्मी सोनवणे हिने 800 मीटर मध्ये - प्रथम, गोळा फेक मध्ये - द्वितीय क्रमांक पटकविला. पुनम माळी 400 मी मध्ये तृतीय क्रमांक पटकावला. मुलींबरोबरच मुलांनीही 14 वर्ष वयोगटामध्ये समृद्ध कोळी या विद्यार्थ्याने थाळीफेक व 600 मी मध्ये अनुक्रमे द्वितीय क्रमांक पटकाविला. 17 वर्ष वयोगटांमध्ये साजन सोनवणे याने गोळा फेक या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकाविला. आणि अगदी चुरशीच्या लढतीत 4*100 मी रिले मध्ये समृद्ध कोळी , आमेषा पावरा, रोहित पावरा , योगेश पावरा यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. विजयी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा शिक्षक एस एल पाटील सर यांनी मेहनत घेतली. जिंकलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक यांनी खूप कौतुक केले व शाळेचे अध्यक्ष डॉ आर आर पाटील साहेब यांनी अभिनंदन केले. संस्थेचे सचिव उज्वल पाटील कार्याध्यक्ष अनिल पाटील प्राचार्य एम डी पाटील शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून कौतुक केले.
0 Comments