जलवाव :(प्रतिनिधी) :
जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी नवे माहिती जनसंपर्क मंत्री ना .गुलाबराव पाटील यांची पाळधी विश्रामगृहात भेट घेऊन त्यांना आपल्या समस्या व आपल्यावर होणाऱ्या अन्याया बाबत निवेदन देऊन चर्चा केली.ना पाटील यांनी सर्व प्रश्न आस्थेने ऐकून घेतले व लवकरच ते
प्रश्न सोडवण्याचे ठोस आश्वासन दिले.जळगावातील एकही पत्रकारा वर अन्याय होऊ देणार नाहीअसे सांगून ते म्हणाले मी सर्व वृद्ध पत्रकार मित्रांना ओळखतो. त्यांनी घेतलेल्या कष्टाची व हाल अपेष्टांची मला जाणीव आहे .ग्रामीण पत्रकार हे शहरातील पत्रकारांपेक्षा कठीण परिस्थितीत पत्रकारिता करतात .त्यांच्या साठीच ही योजना सुरू झाली.पण दुर्दैवानेग्रामीण दुबळे पत्रकारांवरच अन्याय झाला .आमचे सरकार हे सामान्यांचे व दीनदुबळ्यांसाठी लढणारे ,त्यांच्या साठीच आहे कुणावरही अन्याय होणार नाही.आपण निश्चिन्त असा"असे आश्वासन दिले .शिष्टमंडळात अरुण मोरे,शिवलाल बारी,केदारनाथदायमा होते

0 Comments