Header Ads Widget

*शिंदखेडा येथील एस एस व्ही पी एस महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न*.




  शिंदखेडा /(यादवराव सावंत) प्रतिनिधी -- येथील एस एस व्ही पी एस महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे आयोजन चेअरमन प्रफुल्ल 


कुमार सिसोदे व व्हायचेअरमन अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन मेळाव्याचे अध्यक्ष यांनी सरस्वती मातेची पूजा करून दिपप्रज्वलन करून उद्घाटन प्राचार्य डॉ. तुषार पाटील यांनी केले. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. व्हि.एस.पवार यांनी केले. ह्यावेळी उपप्राचार्य विशाल पवार, डॉ.एस.व्ही.बोरसे , डॉ. व्ही.एस.पवार, एस.टी.राऊळ, अधिक्षक एन.बी.भामरे आदी सह प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते. ह्यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक नंदकुमार साळुंखे, सुवर्ण पदक विजेते चंद्रसिंग पाडवी, निकीता पवार या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य डॉ तुषार पाटील यांनी केला. माजी विद्यार्थी अनिल पाटील, निकिता पवार,प्रा. सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. सुर्य बोलत नाही तर प्रकाशच त्याचा परिचय करून देतो, याप्रमाणे तुम्ही उत्तम कार्य करीत राहा लोकच तुमचा परिचय देतील असे माजी विद्यार्थी तथा महाविद्यालयाचे लिपिक अनिल पाटील यांनी सांगितले. जवळपास शंभर हुन अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात गुलाब उमलतो नाजूक कळ्यावर, गवत झुलते वार्याच्या झोतावर, पक्षी उडतो पंख्याचा जोरावर, माणूस जगतो आशेच्या किरणावर, याप्रमाणे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ तुषार पाटील यांनी सांगितले. सुत्रसंचलन डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे तर आभार प्रा. डॉ.एस.एस.पाटोळे यांनी केले. मेळाव्यासाठी महाविद्यालयांचे प्राध्यापक व प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments