Header Ads Widget

*अभिजीत ठाकूर भारतीय जीवन विमा निगमच्या आंतरराष्ट्रीय सन्मानास पात्र...* *दोंडाईचा शाखाधिकारी यांनी ठेवला सन्माचा छोटेखानी कार्यक्रम...*




*जनमत-*

*दोंडाईचा-* येथील तरूण व भारतीय जीवन विमा निगमचे युवा-विमा सल्लागार श्री अभिजीत अम्रुत ठाकुर यांच्या विमा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत भारतीय जीवन विमा निगमने आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान म्हणजे एमडीआरटी (MDRT-USA)-२०२३ पदी सन्मानास पात्र केले आहे. म्हणुन नुकतेच दोंडाईचा शाखेकडून त्यांचा छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम शाखाधिकारी यांनी आयोजीत करत,त्यांना पुढील-भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय जीवन विमा निगमच्या दोंडाईचा शाखेत यावेळी शाखाधिकारी श्री संतोष कासारसाहेब,उपशाखाधिकारी श्री दिपक बोरसे साहेब, विकास अधिकारी श्री योगेश ठाकरे साहेब, श्री बावीस्कर साहेब, श्री बजाज साहेब, श्री विनोद पवार साहेब व शाखेतील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments