डोंगरगाव (प्रतिनिधी )आर आर पाटील - गेल्या एक महिन्याभरापासून वाघाडी फिडर वर येणारे डोंगरगाव कचनपूर वाघाडी खुर्द यातीन गावांना विजेच्या मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत थ्री फेजिंग व सिंगल फेजिंग लाईन अजिबात चालत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही सध्या परिसरात कांदा लागवडीचे काम सुरू असून मजुरांना महागडी मजुरी देऊन वीज नसल्याने काम होत नाही सध्या डोगर गाव येथील एक डीपी संच (बुधले) बंद पडलेला असून अर्धेगाव अंधारात आहे येथील वायरमन बोरसे नामक सतत गैरहजर राहत असून शेतकऱ्यांनी व्यथा कोणाकडे मांडाव्या हा पण मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भात देखील लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत आज शेतकऱ्यांनी परिसरातील पदाधिकारी यांच्या समवेत नरडाणा एम एस ई बी येथील उपअभियंता अस्मार साहेब बेटावद उपकेंद्राचे गुजराथी साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले शेतकऱ्यांचा वीज प्रश्न व वायरमन चा प्रश्न लवकरच निकाली काढू असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले यावेळी प सं सदस्य राजेंद्र देवरे जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश पाटील मधुकर बापू माळी वाघाडी खुर्द संजय पाटील शहाणा भाऊ पाटील विजय पाटील कैलास पाटील गुलाब पाटील कंचनपूर दिलीप पाटील दिनकर पाटील संजय पाटील रोहिदास दाजी पाटील डोंगरगाव इत्यादी शेतकऱ्यांसह पदाधिकारी यांनी अधिकाऱ्यांनाआज निवेदन दिले

0 Comments