Header Ads Widget

*जैन समाजाचे धर्मिक तीर्थ स्थळ श्री सम्मेद शिखरजी ला पर्यटन स्थळ करण्यास जैन समाजाचा विरोध! झारखंड सरकारने धार्मिक भावनांचा आदर करावा!!✍️✍️✍️


नरडाणा-- झारखंड राज्यात जैन समाजाचे धार्मिक स्थळ श्री सम्मेद शिखरजी जागृत देवस्थान आहे.हे धार्मिक स्थळ जैन समाजाचे प्रसिद्ध देवस्थान आहे.या ठिकाणी जैन समाज श्रद्धा आणि आत्मविश्वासाने दर्शन घेण्यासाठी भाविक म्हणून येतात.या ठिकाणाला झारखंड राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने 12 डिसेंबर रोजी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करुन पर्यटन विभागाच्या माध्यमातून विकास करुन हे स्थळ सार्वजनिक खुले करण्याचा तयारीत आहे.झारखंड राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे जैन समाजाचा धार्मिक अनादर आहे.सखल जैन समाज हा कोणत्याही सरकारकडे धार्मिक कार्य अथवा विकासासाठी निधी मागत नाही.कारण जैन समाज हा व्यापारी वर्ग आहे. स्वतःच्या धर्मिक स्थळांची देखभाल, दुरुस्ती व संरक्षण स्वता अथवा ट्रस्टच्या माध्यमातून करतात.झारखंड सरकारकडे किवा पर्यटन विभागाकडे कोणतीही मागणी केली नसतांना पर्यटन स्थळ का? घोषित केले.असा सवाल जैन समाजाचा आहे.कारण इतर पर्यटन स्थळ आहेत त्यांची अवस्था काय आहे. त्यामुळे जैन समाजाची परंपरा आणि धार्मिक स्थळांची पवित्रता लक्षात घेऊन.त्या पवित्र स्थळाला अपवित्र होऊ देणार नाही.म्हणून जैन समाजाचा पर्यटन स्थळ करण्यास विरोध आहे.धार्मिक स्थळ पर्यटन स्थळ झाले तर त्याठिकाणी व्यसनी लोकांची गर्दी होईल व भविष्यात या धार्मिक स्थळाचा चुकीचा उपयोग करण्याची शक्यता आहे.त्यामुळे जैन समाजाच्या भावनांचा आदर करावा.हे धार्मिक स्थळ पर्यटन स्थळ म्हणून रद्द करावे अशी मागणी आज संपूर्ण भारतात जैन समाजाने व्यापार,उद्योग बंद ठेऊन सखल जैन समाजाने मोर्चा काढून स्वतःचे व्यवसाय दुकाने बंद ठेवत सामाजिक मागणी केली आहे.त्यात दोंडाईचा शहरातील सखल जैन समाज सहभागी झाले होते.दोंडाईचा शहरात जैन, नरडाणा शहरात जैन  समाजाने सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेऊन दादावाडी पासुन तर तहसील कार्यालयापर्यंत पाई मोर्चा काढला.हाताला काळे पट्टे बांधून महिलांसह लहान मुलांनी सहभाग घेत झारखंड सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.तहसीलदार आशा गांगुर्डे यांना निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधले आपल्या धार्मिक भावना व्यक्त केल्या. जैन समाज हा देशाचे अर्थचक्र फिरवण्याचे काम करतो. मोठ-मोठे उद्योग व व्यापारी वर्ग आहे.या सोबत स्वतःधर्मरक्षक ही आहेत. म्हणून सरकारने जैन समाज धार्मिक स्थळांची जास्त काळजी करु नये.ज्या ठिकाणी आवश्यकता असले त्या ठिकाणी पर्यटन स्थळ करावे परंतु जैन समाजाचे धार्मिक स्थळ हे पर्यटन स्थळ रद्द करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे .....

Post a Comment

0 Comments