आज 4 डिसेंबर 2022 रोजी
आदिवासी जननायक तंट्या भिल बलिदान दिवस साजरा करून त्रिवार अभिवादन भिल समाज विकास तर्फे केशरानंद कॉम्प्लेक्स समोर
करण्यात आला शिंदखेडा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष माननीय उल्हासजी देशमुख यांच्या हस्ते यांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्यात आले या कार्यक्रमास शिंदखेडा,नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते सुनील चौधरी, नगरसेवक तथा भिल समाज विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, चंदू सोनवणे, सुनील सोनवणे, कालू मोरे, राजेश मालचे, अशोक सोनवणे दोंडाईचा, संजू मोरे, व समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्त नगरसेवक दीपक अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अठराशेच्या दशकात एक तंट्या मामा यांनी ब्रिटिशांच्या विरोधात एक मोठा लढा उभारून भारताच्या स्वातंत्र्यात लढ्यात सिंहाच्या वाटा आहे तंट्या मामांनी ब्रिटिश शासनाला सडो की पडो करून सोडलं होतं ब्रिटिश शासनाने तंट्या मामा यांना 4 डिसेंबर 1889 रोजी फाशीची शिक्षा दिली हेच तंट्या भिल आजच्या पिढीचे प्रेरणास्थान आहेत आजच्या पिढीने त्यांची प्रेरणातून घेवून समाजकार्यात सहभाग घ्यावा


0 Comments