साक्री- ‘शाब्बास गुरुजी’ उपक्रमांतर्गत धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामनेपाडा केंद्र रोहड ता. साक्री येथील उपक्रमशील शिक्षक श्री. शंकर सिताराम चौरे सर यांचा सन्मान करण्यात आला.
दिनांक 3 डिसेंबर २०२२ शनिवार रोजी "शाब्बास गुरुजी" उपक्रमांतर्गत जि. प. प्रा.शाळा जामनेपाडा, केंद्र -रोहोड, ता. साक्री जि. धुळे येथील उपक्रमशील शिक्षक श्री. शंकर सिताराम चौरे सर यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण केले. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व शाळेच्या प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी मॅडम तसेच माननीय शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांनी कौतुक केले. तसेच उपक्रमशील शिक्षक म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यासाठी शंकर चौरे यांना गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे साहेब, मा. शिक्षणाविस्तार अधिकारी सुनिता भामरे मॅडम, मा. केंद्रप्रमुख वा. रा. सोनवणे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास बहिरम सरांचे सहकार्य लाभले.

0 Comments