*जनमत-*
*दोंडाईचा-* येथील भर वस्तीतील चिंचोलीकर महाराज यांचे बंद घराचा निशाणा साधत चोरांनी पाषस्ट्र हजार रोख व साडेपाच तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता भरवस्तीतही सर्वसामान्यांचे घर चोरांच्या नजरेआड सुरक्षित नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
याबाबत मुळ घरमालक फिर्यादी श्री राजेंद्र पुंडलिक चिंचोलीकर (वय-५४) व्यवसाय-किराणा दुकान, राहणार-पंचवटी चौक,चक्कीच्या मागे,दोंडाईचा यांनी दिलेली माहिती अशी की,माझा मुलगा नामे दिपक चिंचोलीकर याचे लग्नकार्य असल्यामुळे आम्ही म्हणजे मी,पत्नी व मुलगा असे सर्व घरातील मंडळी दिनांक ०१/१२/२०२२ गुरूवार रोजी दुपारी ३.०० वाजेपासुन शिवसागर मंगल कार्यालय, धुळे येथे गेलो होतो.त्यामुळे घर बंद होते.दिनांक ०२/१२/२०२२ शुक्रवार रोजी संध्याकाळी सात साडेसात वाजेच्या सुमारास पंचवटी चौकातील राहत्या घरी आलो असता,आम्हाला घराबाहेरून वरच्या मजल्यावरील दरवाज्याची कडी-कुलूप तोडलेले दिसले.त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरीच्या इराध्यातुन दरवाज्याची कडी-कुलूप तोडल्याचे लक्षात आले. आत जावून पाहिले असता स्वयंपाक घरातील डबे इकडे-तिकडे,उघडलेले दिसले.तसेच गोदरेज कपाटात ठेवलेले पन्नास ग्रँम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, पाच ग्रँम वजनाच्या दोन कानातले टोंगलाची जोळी, तीस भार वजनाचे चांदीचे एक कडे व रोख रक्कम पाषस्ट्र हजार रुपये असे एकुण जु.वा.किं.अं. तीन लाख रूपये किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याची माहिती दिली. आज संध्याकाळी दोंडाईचा पोलीस स्टेशनला रितसर फिर्याद देवून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे शेवटी सांगितले.


0 Comments