Header Ads Widget

नंदुरबार जिल्ह्यातच अंगणवाडीच्या दैनंदिन कामकाजाची वेळ पुर्ववत करा अन्यथा, अंगणवाडी कर्मचारी माननीय उच्च न्यायालयात रिपिटेशन दाखल करणार

महाराष्ट्रात 36 जिल्ह्यामध्ये कोणत्याही जिल्हा परिषद ने अंगणवाडीच्या वेळेत बदल केला नाही मात्र नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शासनाची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता फक्त नंदुरबार जिल्ह्यातच अंगणवाडी केंद्राचे भरण्याची वेळ बदल केले आहे सदरवेढही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्रासदायक आहेत तसेच सेविका मदतनीस यांच्या घरात वयोवृद्ध सासू-सासरे आई-वडील आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था करणे आवश्यक पाण्याची व्यवस्था करणे यासाठी त्यांचा पूर्ण वेळ म्हणजे दुपारी दोन वाजून तीस मिनिटापर्यंत अंगणवाडी केंद्र थांबवावे लागते वेळेवर जेवण मिळत नाही दुपारी अंगणवाडी बंद केल्यानंतर काही सेविका मदतनीस यांना मजुरीसाठी शेतात कामाला जावे लागते त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते सदर केलेली वेळ बदलीची कार्यवाही थांबवण्यात यावी पूर्ववत जुन्या वेळेप्रमाणे अंगणवाडीच्या वेळेत वेळेत बदल करण्यात यावा अशी आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे यावर शासनाने पंधरा दिवसात निर्णय करावा अन्यथा अंगणवाडी कर्मचारी माननीय उच्च न्यायालयात रिपिटेशन दाखल करतील






Post a Comment

0 Comments