शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी --
केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून 85 गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असून आगामी काळात शिंदखेडा तालुका विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात
नंबर एक करणारच असा निर्धार आमदार जयकुमार रावल यांनी पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाप्रसंगी केला आहे. पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम साळवे गावाच्या पंचक्रोशीत संपन्न झाला आहे. या योजनेचे भूमिपूजन आमदार रावल यांच्या हस्ते करण्यात आले आहे. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला आहे. 274 कोटी 19 लाख रुपये निधीचे हे काम दीड वर्षात पूर्ण केले जाणार असल्याचे आश्वासन देखील रावल यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले आहे. सिंचन योजनेच्या माध्यमातून आगामी काळात शिंदखेडा तालुक्यात द्राक्षांची बागा उभी करणार असल्याचा विश्वास देखील रावल यांनी व्यक्त केला आहे.
या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून सुलवाडे जामफळ येथून मोठया पाईपलाईन द्वारे पाणी साळवे येथील उंच टेकडी आणण्यात येणार असून तेथील 2 व इतर गावातील 4 अशा 6 जलकुंभावरून 85 गावांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेमुळे 85 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळग्रस्त तालुका म्हणून शिंदखेडा तालुक्याची महाराष्ट्रात ओळख झाली आहे. मात्र या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून दुष्काळाचा ठपका या तालुक्यावरून पुसला जाणार आहे .
याप्रसंगी आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ.सुभाष भामरे, भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती महावीर रावल , जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे, भाजपाचे ज्येष्ठ नेते कामराज निकम, यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट - आमदारांची भर मंचावरून सभापतींसह गटविकास अधिकाऱ्यांना तंबी - पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भात आमदार जयकुमार रावल भाषण करत असताना भर मंचावरून धीम्या गतीने काम करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्या सह सभापती व उपसभापती यांना तंबी दिली आहे. काम जोरात करा , धिम्या गतीने काम करू नका, तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचे वितरण करायचे आहे.
गटविकास अधिकारी शासनाचा सातवा वेतन घेतात मग काम का करत नाही? असं देखील आमदारांनी सुनावला आहे .
केंद्रातून निधी आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करनार- खा. डॉ भामरे - धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुक्याच्या विकासाकरिता केंद्रातील निधी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून आमदार जयकुमार रावल यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून निधीसाठी संघर्ष करणार असल्याचे देखील भामरे यांनी मत व्यक्त केले आहे. तुम्ही राज्य सांभाळा मी केंद्र सांभाळतो असं देखील खासदार भामरे यांनी आमदार जयकुमार रावल यांना उद्देशून म्हटलं आहे. या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी भाषण करतांना निधी कमी पडू देऊ नका, निधी आणण्यासाठी आम्ही संघर्ष करायला तयार आहोत अस म्हणत खासदारांना चिमटा काढला. तर खासदारांनी देखील याला उत्तर देताना म्हटले की, या योजना केंद्राच्याच आहेत तुम्ही दहा लाखाची काय मागणी करताय? सुलवाडे जामफळी योजनेसाठी अडीच हजार कोटी आणले आहे. असं म्हणत पाटील यांनी काढलेले चिमट्याला खासदार यांनी उत्तर दिले आहे. तुमच्यासोबत सदैव निधी आणण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे देखील आश्वस्त खासदारांनी केले आहे.
0 Comments