शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी -- दोंडाईचा येथील राणीपुरा भागात होळीचौकात माजी मंत्री आ.जयकुमारभाऊ रावल यांच्या स्थानिक विकास निधीतून साकारण्यात आलेल्या पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण आ.जयकुमारभाऊ रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे लोकसभाचे खासदार डॉ.सुभाषबाबा भामरे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रासपचे अध्यक्ष आ.महादेव जानकर, राज्यसभेचे माजी खासदार डॉ.विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार रमेश शेंडगे, मल्हारराव होळकरांचे वशंज स्वपनिलराजे होळकर , तळोदयाचे जहागिरदार अमरजितराजे बारगळ, भाजपाचे प्रवक्ते गणेश हाके, धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष आनंद बनसोड, प्रतिक राणा, शितलताई चिंचोले, नगरसेविका मंगला धनगर, धनजंय बारगळ, माजी उपनगराध्यक्ष प्रदिप कांगणे, धनगर समाज अध्यक्ष वाल्मिक धनगर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, अभियंता जगदिश पाटील, शिवनंदन राजपूत, सभापती महाविरसिंह रावल, नबु पिंजारी, कृष्णा नगराळे, रवि उपाध्ये, ईश्वर धनगर, भैया धनगर, सुनिल धनगर, डॉ.अनिल धनगर, महेश धनगर, पप्पु धनगर, लखन रूपनर, यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते.
0 Comments