Header Ads Widget

*शिंदखेडा येथे साईलीला नगर परिसरात गाय चोरीचे प्रमाण वाढले,दोन दिवसांपूर्वी दुभती गाय गेली चोरीला*




शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी -- येथील साईलीला नगर परिसरात गाय चोरीचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात‎ चोराकडून नवीन फंडा सुरू झाला‎ असून पशुधन शेतकरी मात्र हवालदिल‎ झाला आहे.‎एका‎ गायीची किमंत लाखाच्या वर झाली‎ आहे.सध्या बाजारात दुधाला‎ चांगला भाव मिळत असल्यामुळेच‎ शेतकरी वर्ग पशुपालन करण्याकडे‎ वळला आहे.शेतकरी मोठ्या जिकरीने याचे‎ पालन पोषण करत आहे. गेल्या‎ महिनाभरापासून या परिसरातून गाई आणि‎ वासराची चोरी झाली आहे. विशेष‎ म्हणजे काही मिनिटांत वाहनातून ही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चोरी होत आहे.या परिसरात दोन दिवसांपुर्वी‎ पशुधन शेतकरी अशोक बडगुजर यांची देशी जातीची गाय  चोरीला गेली होती.तर काही महिन्यांपूर्वी शेतकरी यशवंत किसन पवार यांची गाय चोरीला गेली होती.अशोक बडगुजर यांची दुभती गाय चोरीला गेल्यामुळे तिच्या वासरू ची दयनीय अवस्था आहे,त्यास बाटलिद्वारे दूध दिले जात आहे त्यामुळे जर कोणास सदर गाय आढळून आल्यास संपर्क साधावा असे आवाहन अशोक बडगुजर यांनी केले आहे.अद्याप गाय चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी केलेली नाही असे सांगितले. शिंदखेडा येथील साईलीला नगरात नेपाळी गोरखा यांच्या द्वारे रात्री पायी गस्त सुरू आहे त्या बद्दल परिसरातील रहिवासी तर्फे त्यांना मानधन दिले जात आहे.शिंदखेडा पोलिसांतर्फे मागील सहा महिन्यापासून या परिसरात पेट्रोलिंग बंद असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments