उडाणे ग्रामपंचायतच्या वतीने सौ . सुमनताई व अंजनाताई यांना पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या माहिलाना प्रोत्साहन मिळावे याकरीता उडाणे ग्रामपंचायत दोन कर्तबगार महिला सौ . सुमनताई बाबुलाल पाटील व श्रीमती अजंना ताई विठ्ठल शिंदे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जयंतीनिमित्त ३१ मे२३ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माहिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . उडाणे ता. धुळे ग्रामपंचायत तर्फे शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य व ग्रा.प.सदस्य श्री कमलाकर शिंदे हे तर पुरस्कार वितरण संरपंच श्रीमती आशाबाई माळीच व उपसरपंच छबूबाई मोरे यांच्या शुभहस्ते देण्यात आले पुरस्कारचे स्वरूप प्रमाणपत्र . ट्रॉफी व पाचशे रुपये शाल श्रीफळ देऊन करण्यात आला . यावेळी सोसायटी चेअरमन पोपट शिंद .धुळे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहिदास हाके. भटू बागुल. बापू पाटील . आशाबाई शिंदे . सुनंदा हाके. श्रीराम .बागुल. बापू बागुल . राजु पदमर. धर्मा बागुल. सुभाष हाके .अशोक बागुल .आत्माराम बागुल. आनंदा वाघ , संजय शिदे. हिलाल पवार . यावेळी ग्रामविस्तर अधिकारी श्री विश्वास बागले यांनी शासनाच्या पुरस्कार विषयी माहिती दिली व रोहिदास हाके. भटू बागुल यांनी मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ग्रामसेवक श्री विश्वास बागले यांनी केले कार्यक्रमासाठी समाधान वाघ . संजय शिंदे हिलाल पवार यांनी काम केले . ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते .
0 Comments