शिंदखेडा येथील प्रगतशील शेतकरी व धुळे नंदुरबार जिल्ह्यातील डी डी सी बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सदाशिव आधार माळी यांची वृद्धपकाळाने दिनांक 28 मे रोजी निधन झाले ते मृत्यू समयी 80 वर्षाचे होते,त्यांची निधनापूर्वी आपल्या मुलाजवळअसलेली इच्छा प्रगट केली होती मुलाने पूर्ण केल्याने माळी समाजाने एक आदर्श निर्माण केला
नोकरी व उत्कृष्ट शेती सांभाळून आपले कुटुंब चालवुन मुलाचे शिक्षण करून त्याला नोकरीस लावणे हे स्वप्न ऊराशी बागळुन नानांनी सुरुवातीपासून संघर्ष मै जीवनातून मेहनत व कष्ट करून संसार थाटला शांत मितभाषी तोंडावर नेहमी गोडवा व संयमी साधी विचारसरणी वयाने जरी मोठे असले तरी प्रत्येकाशी आपल्या मित्राप्रमाणे वागणे हा त्यांचा स्वभाव होता कुठलाही व्यक्ती आला त्याला चहा पाजून आदर सन्मान करणे हा त्यांचा गुणधर्म होता सदाशिव नाना म्हणून ते बँकेत व पूर्ण माळीवाड्यातील परिचीत होते मात्र दोन वर्षापासून त्यांची तब्येत बिघडल्याने शेतात जाणे व बाहेर फिरणे बंद झाले होते मृत्यू हा मानवाला अटळ आहे मात्र त्यांची अंतिम इच्छा एक होती की मला पर्यावरण पूरक गोमातेचे गौरीत अंत्यसंस्कार करावा तसेच माझ्या अंत्यसंमयी गोमातेच्या गौरीची असथि नदीत न सोडता
माझ्या शेतात खड्डा खोदून या खड्ड्यात अस्थी टाकुन त्यात आंब्याचे झाड लावून पर्यावरण पूरक झाडे लावून त्या वृक्षापासून पर्यावरणाचे नदीचे प्रदूषण थांबेल व वडिलांच्या आठवणी या वुक्षानमुळे नेहमीच स्मरणात
राहील
टिकून राहतील ही अपेक्षा मुलांने पूर्ण केल्यामुळे शिंदखेडा येथील माळी समाजापुढे आदर्श उभा केला ते विरदेल चे मंडळ अधिकारी एन स माळी यांचे वडील होते तर समता परिषद चे धुळे जिल्हा उपाध्यक्ष दगा माळी शिदखेडा येथील नगरसेवक युवराज माळी रमेश माळी यांचे काका होते तर भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांचे आजोबा आहेत
,,,,, चौकट ,,वडिलांची इच्छा मृत्यूसमयी पूर्ण केल्याने मनाला समाधान वाटले ते एक उत्कृष्ट शेतकरी विचारसरणीचे होते शेती व वुक्ष लागवड करणे हा त्यांचा छंद होता त्यांची अंतिम इच्छा पूर्ण झाल्याने मनाला समाधान वाटले
मुलगा
एन एस माळी शिदखेडा
0 Comments