---–--------------------------
प्रतिनिधी पाटण:-
तालुक्यातील आदिवासी दलित,शोषित,पिढीत अशा सर्व प्रकारच्या बहुजन बांधवां चा सर्वांगीण विकासाकरिता महाराष्ट्र शासन रोजगार हमी योजने अंतर्गत शेती सिंचन विहिरी करिता सिंचन विहिरी देण्याचे प्रावधान आहे.या योजनेअंतर्गत तालुक्यातील गरजू, गरीब शेतकऱ्यानी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत परंतु त्यांना राज्य स्तरावर मंजुरी मिळत नाही.
३ वर्षापेक्षा अधिक कालावधी होऊन देखील शेतकरी मंजूर हे विहिरीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. पंचायत समिती शिंदखेडा कार्यालयात आवारात रोज शेकडो शेतकरी,मजूर सिंचन विहिरीच्या मंजुरीसाठी किंवा कामासाठी खेटे मारत आहे. प्रशासना कडून नेहमी उडवा उडवीची उत्तरे मिळतात ती अशी कधी ग्रॅंड नाही कधी आचारसंहिता / निवडणुका सुरू आहेत साहेबांची बदली झाली आहे किंवा होणार आहे. अशी उत्तरे देण्यात येतात, पुढील महिन्यात या असे भ्रामक खोटे उत्तर दिले जात आहेत. याचा अर्थ गरीब शेतकऱ्यांची हेतुपुरस्कर पिळवनुक केली जात आहे सिंचन विहिरीचा अनेंक जाचक अटी आहे त्यादेखील शिथील करने गरजेचे आहे सिंचन विहीर वाटप कधी होणार ? एखाद्या गरीब शेतकऱ्याने सिंचन विहीर मिळवण्याकरता आत्महत्या करावी का ? असे अनेक निर्णय प्रश्न उपस्थित राहत आहेत गरीब शेतकऱ्याच्या जीवन मरणाच्या समस्या गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे मांडण्यात आल्या.
कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या काळातनिवडणुका होणार परत आचारसंहिता लागली म्हणून आपण सिंचन विहिरींचे आदेश देणार नाहीत. विहिरी लाभार्थींना मंजुरी बाबत अक्षम्य दिरंगाई बाबत ७ जून पर्यंत स्वयंमस्पष्ट खुलासा द्यावा. अन्य:था मुदतीत आपण खुलासा /माहिती न दिल्यास आम्ही ८ जून पासून आमरण उपोषण किंवा जन आंदोलन उभे करणार आहोत याची गंभीर्यपूर्व दखल घ्यावी , आपण शिंदखेडा तालुक्यातील लाभार्थ्यांना योजनांपासून वंचित नाही ठेवू शकत नाही कारण गेल्या दोन ते तीन वर्षापासून शासनाची कुठलीही योजना आपण कार्यान्वित केलेली नाही यामुळे प्रशासना विषयी लोकांच्या मनात तीव्र नाराजी आहे हे स्पष्ट दिसून येते.सदर निवेदनाच्या प्रति मा.जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.धुळे, यांना पाठविण्यात आल्या आहेत, निवेदन देते वेळी तालुक्यातील शेतकरी ,नागरिक उपस्थित होते.
---––-----–-----------------
प्रतिक्रिया:-
शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी ३ वर्षांपासून सिंचनविहरींच्या कामांना मंजुरी मिळाली नसल्याने प्रचंड वैतागला आहे, . दुसरीकडे कार्यालयाच्या आवारात रोज तालुक्यातील शेकडो शेतकरी विहिरींबाबत विचारणा करण्यासाठी ,मंजुरी साठी खेटे मारत आहेत. तरी प्रशासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, चार महिन्यांपासून योजनेच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे.
शिंदखेडा पंचायत समितीतून सुधारित पद्धतीने शेतकऱ्यांना तात्काळ विहरींच्या मंजुरी देण्यात याव्या. आम्ही तालुक्यातील शेतकऱ्यांसह लवकरच जि. प.कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार आहोत. विहिरी च्या लाभार्थींना मंजुरी बाबत अक्षम्य दिरंगाई बाबत ७ जून पर्यंत स्वयंमस्पष्ट खुलासा द्यावा. अन्य:था मुदतीत आपण खुलासा /माहिती न दिल्यास आम्ही ८ जून पासून आमरण उपोषण करणार आहोत याची गंभीर्यपूर्व दखल घ्यावी ,
प्रा.डॉ. विशाल पवार (सदस्य पंचायत समिती शिंदखेडा)
0 Comments