Header Ads Widget

नूतन विद्यालयाच्या मुलींच्या संघाला कास्य पदक, राज्यस्तरीय शालेय रस्सीखेच स्पर्धेत उपविजेतेपद




  दोंडाईचा ( वि.प्र.)विभागीय क्रीडा संकुल गारखेडा औरंगाबाद ( छत्रपती संभाजी नगर ) येथील मैदानावर २९ मे  रोजी १४/१७/१९ वर्षा आतील मुले व मुली राज्यस्तरीय शालेय रस्सीखेच स्पर्धा झाली.या स्पर्धेत नूतन माध्यमिक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने नेत्रदिपक कामगिरी करत कांस्य पदक प्राप्त करून उपविजेता संघ ठरला. 


       स्पर्धेत मुलीच्या पहिला सामना हा नाशिक विरुद्ध नागपूर  झाला यात नाशिक संघ विजयी ठरला . नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व नूतन माध्यमिक व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने केले.
   दुसरा सामना  पुणे व नाशिक संघात झाला  पुणे संघ विजयी ठरला तसेच तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस घेण्या करीता कोल्हापूर आणि नाशिक यात चुरशीच्या लढतीत  नाशिक संघ विजयी झाला. पुणे आणि अमरावती विभागाने अनुक्रमे सुवर्णपदक व रजत पदक प्राप्त केले.
       तिसरा क्रमांक मिळविला व सर्व खेळाडूंना प्रमाणपत्र व कांस्य पदक देण्यात आले त्या प्रसंगी विभागीय क्रीडा संकुल मान्यवर औरंगाबाद डिएसओ व रस्सीखेच महाराष्ट्र संघटनेच्या अध्यक्ष श्रीमती माधवी पाटील ,सचिव जनार्धन गोपीले व मान्यवर  उपस्थित होते . मान्यवर व पदाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पदक देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले 
     * कोट. --   कर्णधार योगिता भेटेसिंग राजपूत ,उपकर्णधार कावेरी किरणसींग राजपूत, प्रतीक्षा प्रवीण पाटील,वैष्णवी ज्ञानेश्वर पवार, सिद्धी दीपक गिरासे, वैष्णवी सुनील पाटील,हर्षदा देविदास माळी , संस्कृती छोटू बोरसे,भक्ती धनराज माळी  यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
   क्रीडा शिक्षक बी एच पाटील, अमोल पाटील, श्रीमती रोशना पाटील, नंदलाल बागल, एम पी जाधव,एस बी पाटील, कुंदन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
       विजेत्या संघाचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री डॉ हेमंतराव देशमुख चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष डॉ रविंद्र देशमुख, सचिव जुईताई अमित पाटील, अमित पाटील, संचालक अनिताताई देशमुख, प्रशासकीय अधिकारी गणेश चव्हाण प्राचार्य ए डी पाटील प्रा डॉ बी बी पाटील, आदींनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments