पंचायत समितीचे माजी सभापती प्रा सुरेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे ज्येष्ठ संचालक दिलीप आधार भामरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. हयावेळी नगरपंचायत माजी प्रभारी नगराध्यक्ष दिपक देसले, माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिपक अहिरे , काँग्रेसचे
शहराध्यक्ष दिनेश माळी , माजी नगरसेवक अशोक बोरसे, किरण थोरात हयांची प्रमुख उपस्थिती लाभली. हयावेळी शहरातील नामवंतांचा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले. त्यात भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी प्रा. सी. डी.डागा हयांच्या विविध उपक्रम राबवून राज्यस्तरीय दखल घेत, भारतीय जैन संघटनेच्या अल्पसंख्याक विषय राज्य प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल तर शहरातील पत्रकार यादवराव सावंत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई च्या शिंदखेडा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल, आदिवासी चळवळीत आपल्या समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे दिपक अहिरे यांना एकलव्य समाज भुषण मिळाल्या बद्दल, आणि काँग्रेस च्या शहराध्यक्ष पदी दिनेश माळी यांचि निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. हयावेळी दिपक देसले , सुनील चौधरी, दिपक अहिरे , दिनेश माळी यांनी सत्कारार्थिच्या कार्याचा नामोल्लेख करित दिपक दादा मित्र परिवार नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यावर कौतुकास्पद कार्य करत आहे. हयामुळेच प्रेरणा मिळते. तर माजी सभापती प्रा सुरेश देसले यांनी आपल्या मार्गदर्शनातून शहरातील जात पात विसरून उल्लेखनीय कार्याची दखल घेतली जावि हया हेतुने दिपक दादा मित्र परिवार नेहमीच पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्यांच्या कार्यात अजून नवीन भर टाकण्याचे काम करित आहे. हयावेळी काँग्रेस मध्ये मध्यंतरी काळात आलेली मरगळ दूर करण्यासाठी नव्या उमेदीने पुन्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ द्यावा. असे सांगितले. हयावेळी राजेंद्रसिंग उर्फ बाळु निंबा गिरासे यांनी प्रा सुरेश देसले यांच्या हस्ते काँग्रेस मध्ये प्रवेश केला. हया प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष प्रविण पाटील, अँड. निलेश देसले, पिक संरक्षण सोसायटीचे विजय ( नाना ) चौधरी, योगेश माधवराव देसले , गोटु आप्पा महाले , शब्बीर खा पठाण, प्रकाश सताळिस , कैलास वाघ , लोटन आप्पा माळी, वेडु महादु माळी , रहिमशेख खाटिक, लक्ष्मिकांत (बबलू) देसले , मनोज वाडिले , विनोद माळी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक देसले , सचिन देसले, महम्मद शेख , भैय्या मराठे , पंकज देसले, गोलु देसले, रविंद्र देसले हया सह दिपक दादा मित्र परिवार सदस्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन अँड. निलेश देसले यांनी केले .
0 Comments