शिंदखेडा ( यादवराव सावंत , विशेष वृत्तांत ) -- सध्या महाराष्ट्रात अतिशय चिंतेचा आणि जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अख्खा महाराष्ट्र या समस्येमुळे चिंताग्रस्त झालेला
आहे. ही समस्या म्हणजे गौतमी पाटील .तिच्या नृत्यामुळे आतापर्यंत अनेक वाद निर्माण झाले आहेत. आता तिच्या आडनावावरूनही नवा वाद निर्माण झाला आहे. तिने पाटील हे आडनाव लावू नये म्हणून काही मराठा संघटना व त्यांच्या नेत्यांनी इशारे दिले आहेत. जणू काही पाटील या आडनावाचे पेटंट या मराठा संघटनांकडेच आहे. त्यामुळे अन्य कुणाला हे आडनाव वापरता येणार नाही. वापरायचेच असेल तर या स्वयंघोषित मराठा नेत्यांची परवानगी घ्यावी लागेल. याविषयी विशेष वृत्तांत शिंदखेडा तालुका प्रतिनिधी यादवराव सावंत यांनी करुन काही गौतमी पाटील हिच्या आजोड गाव शिंदखेडा येथील नाते कुंटुबातील , सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रतिक्रिया जाणुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. चोपडा तालुका वेळोदे येथील मुळ गाव असलेली गौतमी पाटील आहे. तिचा जन्मच धुळे जिल्हा शिंदखेडा येथेच झाला. लहानाची मोठी देखील शिंदखेडयात झाली. कौटुंबिक वादात तिचे वडील जरी सोडून गेले तरी तिचा व आईचा सांभाळ तिचे आजोबा अभिमन आनंदा भामरे परिवाराने केला. आई हातमजुरी करीत गौतमीला वाढवु लागली येथील आठवी पर्यंतचे शिक्षण करीत हायस्कूल मध्ये देखील कलागुण सादर करायची असे तिच्या वर्गमैत्रिणी सांगतात. मुलीचे पाय पाळण्यात दिसतात. या उक्तीप्रमाणे आज सर्वत्र आपल्या कलागुणांमुळेच सुप्रसिद्ध झाली. हे अनेकांच्या पोटात दुखु लागले. हयावर शिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी अरुण देसले हयांनी आपल्या प्रतिक्रियेतुन म्हणतात की, गौतमी पाटील हीचे आजोबा अभिमन आनंदा भामरे हे आहेत. त्यांच्या घरी लहानाची मोठी झाली आमच्या कडे नेहमी तिचे व तिच्या आईचे येणं असायचे मी जवळुन पाहिले आहे. ती आपली कला सादर करण्यात लहानपणापासून पारंगत होती. शालेय दशेपासुन लग्न कार्यात उत्कृष्ट नृत्य करायची. लहान वयात उत्कृष्ट अभिनय मुळे तिला शाबासकी तेवढीच मिळायची. हे असतांनाच महाराष्ट्रात तिच्या नृत्यावर बंदी आणावी हयासाठी अनेकांनी खटाटोप केली बदनामी आणि आतातर पाटील आडनाव बदलविण्याचा केविलवाणा सध्या नवा वादाला सुरुवात झाली आहे. हे एकप्रकारे कलागुणांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. कला ही विशिष्ट जाती धर्मापुरती मर्यादित आहे का, मी अशा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की, ती मुळ पाटील जातीत जन्माला आली आहे तीची जात तिच राहणार कला सादर करणे अभिनय करणे हे कलागुणांवर असते.जाती धर्मावर नव्हे. हा आडनाव बदलविण्याचा नवा वाद इथेच थांबवावा. जातीचा पुढका आणु नका जेव्हा तिच्या सह कुंटुबाची परिस्थिती खालावली होती तेव्हा कुठे गेली होतीस जात.आजपर्यंत चित्रपट सुष्टीत व्हालीवुड , बॉलीवुड मधील अभिनेत्रीं तोकडे ( अखुड पॅन्ट ) कपडे परिधान करुन नृत्य प्रकार करतात त्यातही अनेक जाती धर्माचे हे दिसत नाहीत का ? गौतमी तर संपुर्ण साडी परिधान करुन लावणी नृत्य प्रकार सादर करते. म्हणून गौतमी पाटील च्या कलागुणांना प्रोत्साहन दयावे. हीच हया निमित्ताने तमाम समाज बांधवाना सांगू इच्छितो. तसेच गौतमी पाटील त्यांचे आजोबा अभिमन आनंदा भामरे सह प्रशांत भामरे यांनी देखील ती पाटील समाजात जन्माला आली ती पाटीलच आहे आणि राहणार कोणतिही जात ती बदलवु शकत नाही. ती लहानपणापासून आमच्याच अंगाखांद्यावर खेळली आहे. तिला लहान पणा पासुन नृत्य करण्याची आवड होती. लग्न कार्यात आणि शालेय शिक्षण घेत असताना स्नेहसंमेलन सहभागी होऊन नृत्य सादर करायची. कलेला कोणताच जात धर्म नसतो . आपल्या कलागुणांना घडलेल्या चुका माफी मागत बाजुला सारुन आता व्यवस्थित कला सादर गौतमी सादर करीत आहे नवीन पाटील आडनाव बदलविण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये असा समाज बांधवाना देत सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करत हा वाद इथेच थांबवावा गौतमी पाटील हिच्या लावणी नृत्य कलेवर आरोप विषयी थोडे जाणुन घेताना काही संदेशात्मक सल्ल्यावर नजर टाकुन पाहुया --
खरेतर, गौतमी पाटील हिचा राज्यभरात मोठा चाहता वर्ग तयार झालेला आहे. नृत्य कार्यक्रमाच्या तिला भरपूर सुपाऱ्या मिळतात. त्यामुळे प्रस्थापित नृत्यांगणांची दुकाने बंद व्हायची वेळ आली आहे. सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे, प्रिया बेर्डे अशा अनेक कलावंतांनी गौतमी पाटील हिच्यावर तोंडसुख घेतले आहे. गौतमीचे नृत्य अश्लिल असल्याचा आरोप घाडगे, बेर्डे, पुणेकर आदींनी केला होता. एवढेच नव्हे तर रसिकांनी गौतमीचे कार्यक्रम पाहू नयेत असे आवाहनही या कलाकारांनी केले होते. त्यांच्या या आवाहनात कलेविषयीची चिंता कमी, अन् गौतमीविषयीची आसूया जास्त दिसत होती.
वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे बर्थडे बॉयला पडले महागात
पाहुणं जेवला का? म्हणताच 25 लोक शेडसोबत कोसळले; गौतमी पाटील पुन्हा चर्चेत
एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराविषयी निश्चितपणे आसूया असतेच. पण मेघा घाडगे व सहकाऱ्यांनी गाठलेली खालची पातळी ही गौतमीच्या नृत्यापेक्षाही वाईट आहे.
मेघा घाडगे व प्रिया बेर्डे या दोघीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. राजकीय पक्षाच्या माध्यमातून त्यांनी केलेले रचनात्मक काम महाराष्ट्राला अद्याप तरी ठावूक नाही. परंतु गौतमी पाटील हिचे करिअर बरबाद करण्यासाठी त्यांनी राजकीय पदाचा मात्र निश्चित वापर केला. थेट अजितदादा पवार यांच्याकडे गौतमीची तक्रार त्यांनी केली. अजितदादांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुनावले व गौतमीचे कार्यक्रम घेऊ नयेत अशी तंबी दिली.
मेघा घाडगेंसारख्या कलाकारांना गौतमी पाटीलने जशास तसे उत्तर द्यायला हवे होते. पण या पोरीने नम्रता व विनयता दाखविली. माझ्याकडून चूक झाली हे तिने मान्य केले. येथून पुढे अशी चूक होणार नाही अशी जाहीर हमी दिली. अजितदादांबद्दल तिने आदर व्यक्त केला. मेघा घाडगे व अन्य कलाकारांबद्दल सुद्धा तिने आदर व्यक्त केला.
यश मिळाल्यानंतर सुद्धा किती विनयशिलता असावी हे सुरेखा पुणेकर, प्रिया बेर्डे, मेघा घाडगे यांनीच गौतमी पाटील हिच्याकडून शिकायला हवे. किर्तनकार इंदूरीकर महाराज यांनीही गौतमी पाटीलवर टीका केली होती. त्यावर सुद्धा गौतमी पाटीलने महाराजांविषयी आदर व्यक्त करून आपली भावना मांडली होती.
मुळात अभिनय व नृत्य हे शास्त्रशुद्ध असावे. त्यात अश्लिलता असू नये याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. परंतु मराठीमधील दिग्गज अभिनेत्रींनी लाज वाटावी इतकी हिन कलाकृती यापूर्वी सादर केलेली आहे. यांत धकधक गर्ल माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, सई ताम्हणकर यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. २० – २५ वर्षांपूर्वी अभिनयाच्या माध्यमातून सादर केले जाणारे अंगविक्षेप समाजमान्य झालेले नव्हते. तेव्हा माधुरी दिक्षितने ‘धक धक करने लगा’ या गाण्यावर छाती पुढे करून नृत्य केले. ‘छोली की पिछे क्या है’ याचा शोध घेण्याचे आवाहनही तिने नृत्यातून केले. परंतु तिच्या अभिनयाचे व नृत्य कलेचे नेहमीच तोंड भरून कौतुक केले जाते.
राधिका आपटे हिने तर कळसच केलेला आहे. झाकून ठेवायचे अवयव सुद्धा तिने सताड उघडे करून दाखविले आहेत. पण तरीही तिच्यावर एवढी जोरदार टीका झाली नव्हती. अभिनेत्री विशिष्ट वर्गातील असल्या तर त्यांनी काहीही केले तर त्यामुळे कलेचा विकास होत असतो. गौतमी पाटील ही ‘नाही रे’ या वर्गातून आलेली असल्यामुळे तिचे यश प्रस्थापित कलावंतांना मान्य होणारे नाही.
गौतमी पाटील हिला मिळत असलेले जम्बो यश हे प्रस्थापित कलाकारांची दुकाने बंद करणारे ठरू लागले आहे. खरेतर, या प्रस्थापित कलावंतांनी ‘आपण आऊटडेटेड’ होत चाललो आहोत, हे मान्य करायला हवे. ज्येष्ठेतेचा मान स्विकारून त्यांनी तरूणांना संधी द्यायला हवी. गौतमी पाटीलसारख्या नवतरूणीकडून काही चुकत असेल तर तिला या क्षेत्रातील मान्यवरांनी ज्येष्ठ या नात्याने वडिलकीचे सल्ले द्यायला हवेत. खासगीमध्ये तिला मार्गदर्शन करायला हवे. पण तसे होताना दिसले नाही. गौतमी पाटील हिची जाहीर बदनामी करून तिचे करिअर कसे बरबाद व्हायला हवे यासाठीच या तथाकथित ज्येष्ठ कलावंतांनी प्रयत्न केले.
‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’ या म्हणीनुसार सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे व प्रिया बेर्डे यांच्या वक्तव्याने गौतमी पाटीलचे काहीच बिघडले नाही. उलट गौतमी पाटीलची प्रसिद्धी अधिक झाली. तिचे नृत्य खरंच अश्लिल आहे का, हे लोक बारकाईने पाहू लागले.
सुरूवातीचा काही काळ सोडल्यानंतर गौतमी पाटील नव्याने जी काही कला सादर करीत आहे, त्यात फार वावगे वाटावे असे काही दिसत नाही. तिची अदाकारी लोकांवर प्रभाव टाकते. अंग पूर्णपणे झाकलेले तिचे नृत्य पाहिले तरी ते प्रभावीच वाटते. तिच्यात अंगभूत कला असल्याचे जाणवते. तिने अश्लिल व अंगविक्षेपांचा कसलाही आधार घेतला नाही तरी तिचे नृत्य प्रभावीच वाटते. प्रभावी नृत्यासोबतच कमालीचा समजूतदारपणा, इतरांचा आदर करण्याची वृत्ती, विरोधकांविषयी सुद्धा नम्रपणे व आदरयुक्त केलेली तिची वक्तव्ये… अशा सगळ्या बाबींमुळे गौतमी पाटीलने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे. या वस्तुस्थितीचा तिच्यावर जळणाऱ्या ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारांनी विचार करायला हवा.
मालिका कलावंत किरण माने यांनी गौतमी पाटीलचे केलेले समर्थन खरोखरच कौतुकास्पद आहे. किरण माने हे स्पष्टवक्ते व सामाजिक भान असलेले अभिनेते आहेत. जातीचे लेबल लावणाऱ्या मराठा नेत्यांची त्यांनी अनुल्लेखाने कानउघाडणी केली हे बरे झाले.
खरेतर मराठा तरूणांपुढे शिक्षण, करिअर, रोजगार असे अनेक प्रश्न ‘आ’ वासून उभे आहेत. आरक्षणासारखे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. अशा सामाजिक प्रश्नांमध्ये लक्ष घालून, सरकारवर दबाव टाकून मराठा समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी या मराठा संघटनांनी ऊर्जा खर्ची घालायला हवी. परंतु उथळ नेत्यांनी गौतमी पाटीलला लक्ष्य केले आहे.
सध्या गौतमी पाटीलचा टीआरपी जोरात आहे. गौतमी पाटील हा शब्द गुगल ट्रेडींगमध्ये सुद्धा जोरात आहे. त्यामुळे गौतमी पाटील हे नाव आपल्या लिखाणातून, तोंडून बाहेर पडले तरी प्रसिद्धी मिळते हे कुणीतरी या मराठा नेत्यांना सांगितलेले असावे. त्यामुळेच त्यांनी गौतमीच्या आडनावावर आक्षेप घेतला.
मी आडनाव बदलणार नाही. हेच आडनाव कायम ठेवणार असल्याचे तिने ठणकावून सांगितले आहे. कायदेशीररित्या प्रत्येकाला आपले नाव, आडनाव काय असावे हे ठरविण्याचा अधिकार आहे. एवढेच नव्हे तर आई वडिलांनी दिलेले नाव सुद्धा बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. त्यामुळे मराठा समाजाने तिच्या आडनावावर कितीही आदळआपट केली तरी जोपर्यंत ती स्वतः ठरवत नाही तोपर्यंत तिचे आडनाव कुणीच बदलू शकत नाही.
मेघा घाडगेंसारखे कलावंत बोंबलून गप्प बसले, तसेच एके दिवशी मराठा नेतेही सुद्धा बोंबलून गप्प बसतील. सध्या तरी गौतमी पाटील हिला सुगीचे दिवस आहेत. नियती गौतमीसोबत आहे. त्यामुळे विरोधकांनी केलेला थयथयाट सुद्धा गौतमीला फायदाचाच ठरत आहे.
0 Comments