Header Ads Widget

तत्कालीन शिंदखेडा तहसीलदार सुनील महादु सौंदाणे यांच्या विरोधात पत्नी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषण बसणार

*दिनांक 1/6/23 नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालय समोर कार्यालाईन वेळेत लाक्षणिक उपोषण वेळ 11ते 6*

*मा.जिल्हाधिकारी धुळे मा.प्रांताधिकारी शिरपूर तसेच तत्कालीन शिंदखेडा तहसीलदार सुनील महादु सौंदाणे यांच्या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी उपोषण....*

उपोषणातील प्रामुख्याने पुढील मागण्या पूर्ण कराव्या.....

१)तहसीलदार सुनील सौंदाणे हे महसूल विभागात 2003 रोजी सेवेत रुजू.परंतु, 2023 आले तरी स्वतःची मुलांची नावे सेवा पुस्तकाला नाहीत... अपत्य 2003 ,2009

२)तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी कधीच लहान कुटुंब प्रमाणपत्र (2005 अधिनियम)भरून दिलेले नाही.
याची दखल शासनाने घेतलेली नाही...... ते भरून घ्यावे.

३)सुनील सौंदाणे यांचे चारित्र्य प्रमाणपत्र कधीच भरलेले नाही.... ते भरून घ्यावे.

३)मुलांच्या नावाची नोंद होण्यासाठी जिल्हाधिकारी धुळे आणि प्रांताधिकारी धुळे यांना गेल्या अडीच वर्षापासून पाठपुरावा तरी दुर्लक्ष कुठलीही कार्यवाही नाही. मुलांची नावे त्वरित सेवा पुस्तकाला लावावी.

४)सुनील सौंदाणे यांचेवर 2015 पासून विविध प्रकारचे फौजदारी गुन्हे दाखल आहेत. याची नोंद शासनाने कुठेच ठेवलेली नाही. सेवा पुस्तकात त्यांच्या कोणत्याच गुन्ह्याची नोंद नाही ती त्वरित घ्यावी.

५)सुनील सौंदाणे यांनी प्रांताधिकारी शिरपूर यांना सादर केलेल्या अहवालात असे म्हटले होते की मी अनेक अपत्य दत्तक घेतलेले आहेत. परंतु याची देखील शासनाकडे वेळोवेळी माहिती मागवली परंतु शासनाने ती देण्यास नकारच दिला. ती माहिती मला मिळावी.
शासकीय अधिकाऱ्याला असे किती अपत्य घेता येतात व कोणत्या नियमाने अशा विविध प्रकारची माहिती मागवली आहे परंतु अद्यापही ती मिळालेली नाही ती मिळावी.


सुनील सौंदाणे यांनी मीना बोडके उर्फ मीना दिलीप मिश्रा तिच्यासोबत दुसरे लग्न केले, याचे अनेक पुरावे दिले. तरीदेखील शासनाने त्यांच्यावर कार्यवाही केली नाही .नोंद नाही, शासनाला फसवलं म्हणून सुनील सौंदाणे यांच्यावर शासनाने गुन्हा दाखल करावा.

६)सुनील सौंदाणे यांना अनैतिक संबंधातून मुले जन्माला आलेले आहेत त्याचे पुरावे दिले. तरी, त्याची दखल घेतलेली नाही ती दखल घ्यावी.

७)एक मे 2022 रोजी शिंदखेडा येथे सुनील सौंदाणे यांच्या विरोधात उपोषण केले होते. याची नोंद सेवा पुस्तकाला नाही व त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही अथवा मला न्याय मिळालेला नाही.आश्वासन दिले परंतु कोणतीच कार्यवाही केलेली नाही. व नोंद नाही.

९)सुनील सौंदाणे यांना शासनाने सध्या निलंबित केलेले आहे. परंतु या निलंबनाचा माझ्या तक्रारींचा काहीही समावेश नाही. त्यामुळे मी केलेल्या तक्रारी व दिलेल्या पुरावे यांचा शासनाने विचार केलेला नाही.

१०) जर मा जिल्हाधिकारी साहेब व प्रांताधिकारी शिरपूर साहेब यांनी मागण्यांची दखल घेतली असती तर मला आज आपल्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची वेळ आली नसती.

११) जर तहसीलदार सुनील महादू सौंदाणे असं म्हणत असतील की तो मी नव्हेच आणि मीना बोडके या बाईला मी ओळखत नाही तर त्यांनी संबंधित सुनील महादू सौंदाणे व मीना अशोक बोडके उर्फ मीना दिलीप मिश्रा उर्फ सय्युरी हिमांशू आणि ओंमकार दिलीप मिश्रा उर्फ हर्षवर्धन सौंदाणे. यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा होता याची नोंद शासनाकडे असेल ती मला मिळाली.

१२) आराध्या सुनील सौंदाणे या मुलीच्या शाळेच्या ऍडमिशन कार्डवर तहसीलदार सुनील सौंदाणे शिंदखेडा तहसीलदार या कार्यालयाचा उल्लेख आहे. तर, शासनाला गांभीर्याने विचार करावासा का वाटला नाही? की सुनील सौंदाणे नामक दोन तहसीलदार कोण? तोतया तहसीलदार नेमका कोणता? जर याची नोंद असेल तर ती द्यावी. आणि जो खोटा तहसीलदार असेल त्याच्यावर तहसीलदारांनी गुन्हा दाखल केला असेल की त्यांच्या नावाचा गैरवापर होतो म्हणून त्याची प्रत मला मिळावी.

१३) तरी ,माझी विनंती आहे की माझ्या या मागण्या आपण पूर्ण कराव्या . जोपर्यंत आपण माझ्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत मी आपल्या कार्यालयासमोर माझ्या मुलांच्या न्याय हक्कासाठी मी आमरण उपोषण करेल याची आपण दखल घ्यावी.

सौ वैशाली सुनील सौंदाणे/चव्हाण
नासिक

Post a Comment

0 Comments