म्हैस मालक रामसिंग वाघ तलाठी रुपेश कोळी पोलीस पाटील युवराज माळी धनादेश देताना तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे दिनांक 16,3,2023रोजी,गावा बाहेरील आपल्या राहत्या घराच्या अंगणात रात्री बारा व एकच्या सुमारास रामसिंग तानकु वाघ यांच्या स्वताच्या मालकीची चार ते पाच वर्षाची दुभती म्हैस बांधली होती नैसर्गिक आपत्तीत विज पडून म्हैस मयत झाल्याने तलाठी रुपेश कोळी पोलीस पाटील युवराज माळी व डॉ युवराज देसले घटनास्थळी पंचनामा पाठपुरावा करून सदर घटनेच्या पंचनामा करून महसूल विभागा ला कळवले होते याबाबत वेळोवेळी पाठवा करून शासन स्तरावरून देण्यात येणारी पशुधन खरेदी सहाय्य सानुग्रह अनुदानाचा तीस हजार रुपयांच्या धनादेश शिंदखेडा येथील तहसीलदार माननीय ज्ञानेश्वर सपकाळे मंडळ अधिकारी कोळी तलाठी रुपेश कोळी भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी व पशुधन शेतकरी रामसिंग तानकु वाघ यांना तहसील कार्यालयात दिनांक 25 मे रोजी तहसीलदाराच्या हस्ते देण्यात आला
0 Comments