Header Ads Widget

*धुळे जिल्ह्यात,३३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबीत*



धुळे ः शेतकरी आता सुध्दा जे धान्य पिकवतात  त्यांना नागविण्याचा अघोरी उद्योग करणार्‍यांविरुध्द आम्ही शंंखनाद केला. शेतकर्‍यांना लुटणार्‍या लबाड कृषी सेवा केंद्रांविरुध्द वृत्त छापत शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा केला. त्याचेच फलीत म्हणजेच धुळे तालुक्यातील सोनगीर येथील लक्ष्मी ट्रेडर्सचा खत परवाना रद्द झाला. अन्य ३३ कृषी सेवा केंद्रांचे परवाने देखील निलंबित करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. परवाना रद्द करुन अथवा कृषी सेवा केद्रांचे परवाने निलंबित करुन कृषी विभागाने थांबू नये ही आमची कळकळीची विनंती आहे. बळीराजाला कफलत करणार्‍या या प्रवृत्तींविरुध्द पोलिस दप्तरी गुन्ह्यांची नोंद होवून त्यांना तरुंगात खड्या फोडायला पाठविले पाहिजे अशी जनसामान्यांची अपेक्षा आहे आणि ती रास्त देखील आहे. मुळात कृषी विभागाने शेतकर्‍यांना फसविणार्‍या या कृषी केंद्र चालकांविरुध्द गुन्हा दाखल करावा अशी आमची आग्रही मागणी आहे.  खरीप हंगामात  शेतकर्‍यांकडून पिकांसाठी खतांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असते. त्याचाच गैरफायदा घेत ग्रिन फिल्ड अ‍ॅग्रो केमीकल इंडस्ट्रीज प्रायव्हेज लिमिटेड या कंपनीचे बनावट मिश्र खतांची होलसेलमध्ये विक्री   धुळे जिल्ह्यात केली जात होती. कृषी विभागाने दखल घेत भरारी पथकांकडून छापेमारी झाली. या  छाप्यात १८: १० खत विक्रीस अनियमितता आढळून आल्याने  लक्ष्मी ट्रेडर्स सोनगीर ला कृषी विभागाने दणका दिला. लक्ष्मी ट्रेडर्स सोनगीरने त्यांच्या होलसेल परवान्यामध्ये ग्रिन फिल्ड अ‍ॅग्रो कंपनीचे उगम प्रमाणपत्र घाऊक परवानामध्ये समाविष्ट न करता भुमी प्रॉप सायसन्स धुळे या अनाधिकृत विक्रेत्यांमार्फत जिल्ह्यातील किरकोळ खत विक्रेत्यांना बेकायदेशिर बनावट मिश्र खताचा पुरवठा केला. या बनावट खतांची ‘जड‘ असलेल्या  लक्ष्मी ट्रेडर्सला खत परवाना कृषी विभागाने रद्द केला आहे. तसेच रोहित कृषी सेवा केंद्र दातर्ती, बालाजी अ‍ॅग्रो दहिवेल, दोस्ती फल्टी लायजर्स दिघावे, कन्हैय्यालाल कृषी सेवा केंद्र,कुडाशी, मातृभुमी सेवा केंद्र, रोहोड, तिरुपती कृषी सेवा केंद्र पिंपळनेर, न्यू माऊली कृषी सेवाकेंद्र बेहेड हे साक्री तालुक्यातील तर धुळे तालुक्यातील रघुवीर समर्थ कृषी सेवा केंद्र तरवाडे, जाणकी कृषी सेवा केंद्र नेर, साई अ‍ॅग्रो एजन्सी फागणे, आई अंबीका कृषी सेवा केंद्र हेंंद्रण, नवनाथ कृषी सेवा केंद्र धाडणे, महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र आर्वी, प्रकाशचंद्र जैन कृषी सेवा केंद्र,खेडा, जोगेश्वरी कृषी सेवा केंद्र लामकानी, साईकृृपा कृषी सेवा केंद्र नगाव, ओम संत जनार्दन कृषी सेवा केंद्र बोरकुंड, कैलास अ‍ॅग्रो,भदाणे, शिंदखेडा तालुक्यातील  पार्वताआई कृषी सेवा केंद्र होळ, साक्री तालुक्यातील निर्मल कृषी सेवा केंद्र खुडाणे,मोनिका कृषी सेवा केंद्र म्हसदी, धरती कृषी सेवा केंद्र,कुडाशी, कृष्णा अ‍ॅग्रो मॉल,साक्री, माहेश्वरी कृषी सेवा केंद्र दहिवेल, पाटील अ‍ॅग्रो एजन्सी,विटाई, शिवनेरी अ‍ॅग्रो एजन्सी, पिंपळनेर, विघ्नहर्ता कृषी सेवा केंद, पिंपळनेर, सुलाईमाता कृषी सेवा केंद्र दहिवेल, मातृभुमी कृषी सेवा केंद्र रोहोड,संत काळुमामा कृषी सेवा केंद, वेहेरगाव फाटा,आरुष कृषी ट्रेडसे,सामोडे, बांगर कृषी सेवा केंद्र,खुडाणे यांचा समावेश आहे.कृषी केंद्रांचा खत परवाना रद्द करणे,परवाने निलंबित करणे ही समाधानाची बाब असली तरी या परवाना धारकांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, यामुळे  असे गैरकृत्य करण्याास यापुढे कोणीही धजावणार नाही.

Post a Comment

0 Comments