केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी एकत्र आलेल्या देशातील सर्व प्रमुख विरोधीपक्षांच्या इंडिया आघाडीची ताकद आणखी वाढली आहे. यापूर्वी या आघाडीत २६ राजकीय पक्षांचा समावेश होता आता ती संख्या २८ इतकी झाली आहे. उद्या मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची बैठक *गुरुवार दि ३१ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी २.३० वाजता* काँग्रेस भवन, धुळे येथे आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतील बैठकीच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करणे आणि जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या बाबतीत प्राथमिक चर्चा करणे हा या बैठकीचा उद्देश आहे.
प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष, *आ. कुणाल बाबा पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या या धुळे जिल्हा इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, आजी माजी आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, महिला, युवक, अल्पसंख्याक, अनुसूचित जाती-जमाती, इंटक, किसान, ग्राहक संरक्षण या इतर सेल, आघाडीच्या सर्व पदाध
0 Comments