Header Ads Widget

तळवाडे येथे पोलीस पाटील यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार



अमळनेर तालुक्यातील तळवाडे येथील पोलीस पाटील पदी नक्कीच निवड झाल्याबद्दल त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य ताईसो जय श्री अनिल पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे मदत व  पुनर्वसन मंत्री आपत्ती व्यवस्थापन कॅबिनेट मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील उपस्थित होते यावेळी नूतन पोलीस पाटील सविता शेखर पाटील यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने गावातील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहात सत्कार करण्यात आला यावेळी नामदार अनिल पाटील यांनी सत्कार प्रसंगी उत्तर देताना  आपल्या मनोगत पोलीस पाटील हे पद गावातील प्रतिष्ठेचे पद असून गावातील कायदा सुव्यवस्था तसेच महसूल यंत्रणेला वेळोवेळी सहकार्य करून शासनाच्या आदेशानुसार पारदर्शकपणे काम करून आपली जबाबदारी सांभाळावी तसेच गाव शांतता प्रिय ठेवण्यासाठी प्रयत्न करावे आपल्या गावातील एक सुशिक्षित महिलेला पोलीस पाटील पदाची जबाबदारी मिळाल्याने गावकऱ्यांनीही आपल्या सुनेला लेकी प्रमाणे सांभाळून पोलीस पाटील पदाची प्रतिष्ठा  व गाव  तंटामुक्त ठेवण्यासाठी गावकऱ्यांनीही प्रयत्न करावे गावात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता प्रस्थापित राहिल्यास गावाचा आपोआप विकास होतो आपले गाव एक शांतता प्रिय व परिसरात आदर्श असे गावाची ख्याती आहे यासाठी मी शासन स्तरावरून गाव विकासासाठी  विकास निधी  आणण्यासाठी प्रयत्न करीन यावेळी ह भ प देव गोपाल महाराज तळवाडे येथील सरपंच रामकृष्ण पाटील उपसरपंच गावातील ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments