- "बाटली भर निर्जंतुक पाण्यात चिमुट भर मिठ. "
काही आजारामध्ये पाणी पिता येत नाही, किंवा तोंडावाटे पाणी पचत नाही अशा वेळी थेट रक्तातुन पाणी द्यावे लागते, रक्तामध्ये मिठा सारखे क्षार असतात त्यामुळे थेट रक्तातुन पाणी देतांना त्यात मिठ व इतर क्षार घालतात. या निर्जंतुक खारट पाण्याला सलाईन म्हणतात.
"ग्लुकोज सलाईन म्हणजे काय...?
बाटली भर निर्जंतुक पाण्यात 25 ग्रॉम साखर व 5 ग्रॉम मिठ. 1 कप गोड चहात किंवा 2 मोठ्या बिस्कीटात जेवढी साखर असते 15 रूपयाच्या चहा येवढी शक्ती एका ग्लुकोज सलाईन मधुन मिळते ग्लुकोज सलाईनची
शक्ती आपल्याला केवढ्याला पडते...? 150रू.... 250रू. 300रू , 400 रू
गरज नसतांना सलाईन घेतल्यामुळे पैसा तर जातोच पण काही वेळा जंतुबाधाही होऊ शकते शिवाय हृदयाची, फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झालेली असल्यास सलाईन घेणे जिवाला धोकादायक ठरू शकते.
सलाईनची खरी गरज केव्हा असते.....?
• पानी / रक्त शरीरा बाहेर वेगाने जात असेल उदा. अपघातात रक्त जाने जोरदार जुलाब उलटया गंभीर आजारा मुळे जिवाला धोका, शस्त्रकिया वेळी,
• आजारी माणुस पाणी पिऊ शकत नसेल.
उदा. जोरदार उलट्या. बेशुध्दी. शिरेतून सतत औषध द्यायची असेल.
• बाळांतपणात पुरेशा कळा येण्यासाठी.
गरज नसतांना सलाईन घेऊ नका
सलाईनने ताकद / शक्ती येत नाही. आपल्या मोलमजुरी चे व कष्टाचे पैसे व्यर्थ घालवू नका सर्व डॉक्टर्स देवमाणूस नाही राहत टाळू वरची लोणी खाणाऱ्यांचे प्रमाण काही कमी नाही.. आपल्या मुला बाळांना खाऊ घेयायला आपण विचार करतो . आयुष्यभर काटकसर करता पण दवाखान्याचा बिलासाठी व्याजाने पैसे घेतात मायबापांनो सर्तक रहा.
या क्लिनिकमध्ये अनावश्यक सलाईन दिल्या जात नाही कृपया सलाईन साठी डॉक्टराना आग्रह करू नका. *आण्णा कोळी महादेवपुरा दोंडाईचा 🙏*
0 Comments